मतमोजणी केंद्रालगतच्या वाहतूक मार्गात बदल, चालकांनो, पर्यायी मार्गाचा अवलंब करा

residentional photo
residentional photo

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी गुरुवारी (ता.24) होत आहे. शहरात पाच ठिकाणी मतमोजणी केंद्रे आहेत. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन हा परिसर "नो-व्हेईकल' झोन केला आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने या पाचही केंद्रांच्या वाहतूक मार्गात बदल केला आहे. चालकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक करावी, अशी अधिसूचना वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी काढली आहे. 

शहरातील पूर्व, मध्य, पश्‍चिम, देवळाली तसेच इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघांची मतमोजणी शहरात होणार आहे. यात आडगाव नाका येथील विभागीय क्रीडासंकुलात नाशिक पूर्व, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक मध्य, सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमवर नाशिक पश्‍चिम, नाशिक रोड येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देवळाली, तर शासकीय कन्या विद्यालयामागील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघाची मतमोजणी होईल. मतमोजणीकडे शहर-जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मतमोजणी केंद्रात नागरिकांची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन गुरुवारी सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत मतमोजणी केंद्राजवळील मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. 


बंद मार्ग व पर्यायी मार्ग असा ः 
* विभागीय क्रीडासंकुल : 
विभागीय क्रीडासंकुलसमोरील सर्व्हिस रोड हिरावाडी टी पॉइंट ते के. के. वाघ महाविद्यालय चौफुलीपर्यंत, तसेच हिरावाडी टी पॉइंट ते पाटापर्यंतच्या मार्गावर वाहतूक बंद. या मार्गावरील पर्यायी वाहतूक हिरावाडीकडून सर्व्हिस रोडने मुंबई-आग्रा रोडवरून येणारी वाहतूक हिरावाडी काट्या मारुती चौक व स्वामी नारायण चौकाकडून इतरत्र वळवली जाईल. 
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह : 
किनारा हॉटेल ते वडाळा रोड पुलापर्यंत तसेच भाभानगरकडून गायकवाड सभागृहाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद. या मार्गावरील वाहतूक नागजी सिग्नल भाभानगरमार्गे मुंबई नाक्‍याहून इतरत्र जाऊ शकेल. तसेच मुंबई नाक्‍याहून नागजी पुलाकडे येणारी वाहतूक भाभानगरमार्गे नागजी सिग्नलकडून वडाळा गाव व इतरत्र जाऊ शकेल. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे साईनाथ चौफुलीकडून इतरत्र जाऊ शकेल. 
* छत्रपती संभाजी स्टेडियम : 
सिडको रुग्णालय ते अंबड लिंक रोड, महाले पेट्रोलपंप ते मायको हॉल व आयडीयल कॉर्नर ते हॉटेल एक्‍सलेन्सी मार्गावरील वाहतूक संपूर्ण बंद. या मार्गाऐवजी डीजीपीनगर, अंबडगाव-माउली लॉन्स या मार्गाचा तसेच पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर या मार्गांवरून इतरत्र वाहतूक जाऊ शकेल. 
* महापालिका विभागीय कार्यालय : 
मुक्तिधाम चौक ते सत्कार पॉइंट या मार्गावरील दुहेरी वाहतूक बंद. त्याऐवजी वाहनचालकांनी बिटको चौकाकडून सत्कार पॉइट जावे, तसेच नाशिक रोड रेल्वेस्थानक, रिपोर्ट कॉर्नर ते सत्कार पॉइंटकडून देवळाली कॅम्प, भगूरच्या दिशेने जाऊ शकतील. 
* छत्रपती शिवाजी स्टेडियम ः 
सीबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल दुतर्फा वाहतूक बंद. त्याऐवजी वाहनचालकांनी सीबीएसकडून अशोकस्तंभ रविवार कारंजा, पंचवटीकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नलमार्गे जाईल. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com