त्र्यंबकेश्‍वर देवस्थानवर असावेत तेरा विश्‍वस्त: ललिता शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

नाशिक : सद्य स्थितीत त्र्यंबकेश्‍वर देवस्थानवर नऊ सदस्य कार्यरत असून 5 सदस्य परंपरेने कायम असून हे सदस्य आपआपल्या हितसंबंधांत गुंतलेले असतात. उर्वरित चार विश्‍वस्तांकडून सादर झालेले भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजुर होत नाहीत. त्यामूळे त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्तांची संख्या वाढवून 13 करावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती विश्‍वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

   विश्‍वस्त संख्या वाढविण्यासह ट्रस्टच्या अध्यक्षपद सर्व विश्‍वस्तांना ठराविक कालावधीसाठी संधी मिळावी, असे याचिकेत नमुद केले असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. शिंदे म्हणाल्या, की ट्रस्टची एक हजार एक जमीन असून विविध घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतांना मात्र देवस्थान ट्रस्टचा विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. विकास खुंटण्याचे प्रमुख कारण विश्‍वस्त मंडळाची मर्यादित सदस्य संख्या असल्याचे लक्षात आल्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेची पुढील सुनावणी 2 जुलैला होणार आहे. विश्‍वस्त मंडळात महिलांसाठी आरक्षण असावे अशी मागणी आहे.
 
त्र्यंबकेश्‍वर आज युनेस्कोच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहचले आहे. त्यामूळे जबाबदारी वाढली आहे. पाच वर्षांत आलेल्या अनुभवावरुन भाविकांच्या हिताबाबत विविध विषय निदर्शनात आले. भाविकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असता, बहुमताने तो हानुन पाडला जातो. यामूळे धर्मदाय आयुक्‍तांकडून निवडलेले चार सदस्य नेहमीच अल्पमतात राहतात. भाविकांचा ओघ बघता त्यांना लागणाऱ्या मुलभूत सोयी, त्यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा कशी उभी करता येईल हे बघणे गरजेचे आहे. देशातील अन्य देवस्थानांमध्ये जर उच्च प्रतिच्या सुविधा उपलब्ध होत असतील, तर त्र्यंबकेश्‍वर देवस्थान का मागे रहावे असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 
 
Web Title: marathi news trambakashwar devsathan