ब्रह्मगिरी प्रदक्षिणेत टाळा सेल्फीचा मोह 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नाशिक : सर्व वयोगटांत "सेल्फी'चा नाद वाढत चालला असून, त्यात स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत आहे. त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबालाच भोगावे लागल्याचे चित्र जिल्ह्यातच नव्हे, तर राज्य, देशातील विविध भागांतील घटनांवरून दिसून आले आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेवेळी सेल्फी घेताना अशी वेळ आपल्यावर येऊ नये, याची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्‍यक आहे. म्हणून "सेल्फी घेणे टाळा' हाच कानमंत्र भाविकांनी "बम बम भोले' म्हणत कुटुंबीयांकरिता जपावा. 

आजची तरुणाई सेल्फीमध्ये पुरती हरवून गेली आहे. मोबाईल घेताना त्याच्या इतर फीचर्सपेक्षा सेल्फीसाठीचा फ्रंट कॅमेरा किती पिक्‍सलचा आहे याच्यावर तरुणांचा भर असतो. सोशल मीडियावर भरपूर लाइक्‍स आणि कमेंट्‌स मिळविण्याच्या हव्यासापोटी सेल्फी काढताना बऱ्याच जणांचा जीव जातोय, ही शोकांतिका आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते,

मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून सेल्फी काढताना जे रेडिएशन तयार होतात ते त्वचेला खूप हानिकारक असतात. त्या रेडिएशनला सनस्क्रीन लोशनचा थरही थोपवू शकत नाही. ज्यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात. चांगल्या आठवणी जपून ठेवायला सेल्फीचा वापर जरूर व्हावा; परंतु भान हरपून आणि आपल्या जिवाशी खेळून सेल्फी काढणे चुकीचेच आहे. एकंदर पाहता सेल्फीचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत. 

नेमकं कशासाठी आपण जातो आहे, हे भाविकाने लक्षात घ्यावे. जो काही आपला धार्मिक भक्तीचा भाव आहे तो आणि सेल्फी या दोन गोष्टी विभिन्न आहेत, हे आवर्जून लक्षात घ्यावे. भक्तीत निसर्ग डोळ्यांत साठवावा. 
- अमोल कुलकर्णी, 
मानसविकासतज्ज्ञ, नाशिक 

आयुष्य केवळ सेल्फीसाठी नव्हे, तर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. सेल्फीच्या नादात ते गमावू नका. सेल्फीच्या मोहापायी तरुण पिढीपासून ज्येष्ठापर्यंत अनेकांनी जीव गमावले आहेत. त्यामुळे मजा करताना स्वतःची काळजी घ्या. ब्रह्मगिरीच्या प्रदशिक्षणेवेळी डोंगर, दऱ्याखोऱ्यांवरील धोक्‍याची ठिकाणे आणि उंच ठिकाण टाळावे. 
- महेंद्र पवार, तहसीलदार, 
त्र्यंबकेश्‍वर 

ृमृत्यूची मुख्य कारणे 
- उंचावरून कोसळणे 
- बुडणे 
- रेल्वेची धडक बसणे 
- सामूहिक सेल्फी घेताना अधिक मृत्यू 
 
Web Title: marathi news trambakshwar