त्र्यंबकेश्‍वरच्या अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकसभा सभापती,मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

नाशिकः त्र्यंबकेश्‍वर येथील निलगिरी पर्वतावर साकारण्यात आलेल्या अन्नपूर्णा माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारपासून (ता. 18) सुरू होणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात लक्षचंडी महायज्ञ होणार आहे. मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी (ता. 21) होणार असून त्यासाठी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध साधुमहंत, मंत्री, आमदार व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रमुख संयोजक शामकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. सिंघल पुढे म्हणाले, की त्र्यंबकेश्‍वर येथे निलगिरी पर्वतावर 3 एकर जागेत भव्य अन्नपूर्णा मंदिर साकारण्यात आले आहे. ज्योर्तिलिंग व अन्नपूर्णा मंदिर असा योग भारतात फक्त दुसऱ्याच ठिकाणी आहे. या मंदिरात अन्नपूर्णा देवीसोबत सरस्वती आणि महाकाली या दोन मूर्त्याही बसविण्यात आल्या आहेत. शेजारी भैरवनाथाची संगमरवरी मूर्ती बसविली आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती पंचधातूपासून बनविलेली असून तिचे वजन 1931 किलो इतके आहे. महामंडलेश्‍वर विश्‍वेश्‍वरानंदगिरी महाराज यांनी पुढाकार घेऊन हे मंदिर उभारले. 1995 मध्ये सुरू झालेले काम आज पूर्ण होत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रविवारी (ता. 18) सकाळी 8 वाजता कलशयात्रेने सुरूवात होणार आहे. त्यानंतर दहा दिवस लक्षचंडी यज्ञ होणार आहे. यासाठी बत्तीस हजार चौरस फुटाचा भव्य यज्ञमंडप उभारण्यात आला असून 700 पंडित तसेच 100 जोडपी या यज्ञात सहभागी होणार आहे. अन्नपूर्णा माता प्राणप्रतिष्ठा मुख्य सोहळा सकाळी 9 वाजता होणार आहे. तसेच या सोहळ्याचा समारोप 28 तारखेला दुपारी होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या दहा दिवस चालणाऱ्या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

Web Title: marathi news trambakshwar