अंजेनेरी येथे विजेचा शॉक लागून दोन बालकांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

 त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजेनेरीच्या दर्याची वाडी येथे दोन लहान मुलांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना  रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

 त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजेनेरीच्या दर्याची वाडी येथे दोन लहान मुलांना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना  रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

   रविवारी सायंकाळी च्या सुमारास विकास गोटीराम रामसे (वय 12) रा मुळेगाव व गोरख भाऊसाहेब भोईर रा राजूर (वय 12) हे दोघेही अंजेनेरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मामा कडे राहून शिक्षण घेत होते. रविवारी  6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही मुले घरी न आल्याने पालकांनी त्याचा शोध घेतला मुले कुठे गेली शोध लागत नाही म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तशी तक्रार देखील दिली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली त्यात तर मुले त्याच वाडी शेजारी विजेच्या पोला जवळ मृत अवस्थेत सापडली.त्याना विजेचा शॉक बसल्याने त्याचा दुदैर्वी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असल्याने वीज कर्मचारी यांच्या बद्दल रोष व्यक्त होते.

घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रमजीवी  संघटनेचे भगवान मधे यांनी वीज वितरण कंपनीने पावसाळ्या आदीचे दुरुस्तीचे काम न केल्याने दोन बालकांना जीव गमावावा लागला असल्याने वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची  मागणी केली आहे.घटनेची माहिती होताच शिवसेना तालुका प्रमुख संपत चव्हाण यांच्यासह उपसरंचप पंडित चव्हाण,सदस्य गणेश चव्हाण,राजू बदा दे,कमलू कडाळी ,राजू शिद यांनी घटनस्थली धाव घेऊन पंच्नस्मा करण्यासाठी तलाठी याना बोलविले.

Web Title: marathi news trambakshwar anjenri two boys dead

टॅग्स
फोटो गॅलरी