कुशावर्ताच्या तिर्थांचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वीतोपरी मदत-मुनगंटीवार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

त्रंबकेश्वरचे पवित्र तीर्थ कुशावर्ताचे पाणी कायम नितळ रहाण्या साठी आधुनिक तंत्रद्यानाची मदत घेउन त्याची व्यवस्था पालिकेस करता येइल. तीर्थाचे सुशोभिकरण करुन संवर्धन पालिका करु शकेल. अशा स्वरुपाचे काम करण्याच्या योजनेचा निधीत कमी पडणार नाही.,असे राज्याचे वन मंत्री सुधिर मुनगंट्टीवार यांनी केले. श्री.मुनगंटीवार यांनी आज  त्रंबकेश्वरला भेट देऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

त्रंबकेश्वर पालिकेच्या विविध कामांसाठी साडे तेरा कोटी रुपयांचा निधी मंजुर असुन त्याची रक्कम पालिकेकडे वर्ग करण्यात येत असल्याचे  श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले. या वेळी पालिकेचे नगर सेवक व पदाधिकारी ,वन खात्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 कुशावर्त तीर्थावर जाण्याचेही त्यांनी टाळले.मंदीरात दर्शनास आल्यावर त्यांच्यासह असलेल्या मोठ्या लवाजम्यामुळे दर्शन रांगा थांबविण्यात आल्याने बाहेरील आलेल्या भाविकांनी रोष व्यक्त केला.
मंदीराच्या दक्षिण दरवाजात फोटो सेशन करण्यात आले  पण खाजगी मोबाइल मध्ये कोणासही फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला.
 
Web Title: marathi news trambakshwar temple mungantiwar visit