विश्‍वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडून दूरध्वनी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टवर विश्‍वस्तपदासाठीच्या चार जागांसाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. ट्रस्टच्या विश्‍वस्तपदावर वर्णी लागावी यासाठी थेट केंद्रीय मंत्री, पालकमंत्र्यांकडून शिफारशी येऊ लागल्या आहेत. काही उमेदवारांसाठी तर थेट दूरध्वनीच आले आहेत. देवस्थानच्या ट्रस्टवर विश्‍वस्त होण्यासाठी अनेकांचा या-ना-त्या मार्गाने खटाटोप सुरू आहे. मात्र, सहआयुक्‍तांनी न्यायिक नोंद(ज्युडिशियल नोट)ची तंबी कार्यालयीन विभागाला दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. 

  त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टवर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांसह नऊ सदस्यांचे विश्‍वस्त मंडळ असते. यात जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष, तर त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तुंगार प्रतिनिधी, पुरोहित संघाचे प्रतिनिधी, पुजारी कुटुंबीयांचे प्रतिनिधी यांचे चार सदस्य असतात. यातील चार सदस्यांची निवड करावयाची असते. या चार विश्‍वस्तपदासाठी गुरुवारपासून (ता. 28) प्रत्यक्ष मुलाखती सुरू झाल्या आहेत. यानुसार 4 जुलैपर्यंत 113 उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. काहींसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राजकीय नेत्यांनीही संपर्क साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे विश्‍वस्तपदासाठीची चुरस दिसली. दरम्यान, शुक्रवार(ता. 29)च्या मुलाखतींसाठी काही साधू-महंतांनीही हजेरी लावली होती. 

नीलिमाताई पवारांची अनुपस्थिती 

"मविप्र'च्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांनी त्र्यंबकेश्‍वरमधील काहींच्या आग्रहास्तव विश्‍वस्तपदासाठी अर्ज भरला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता. 29) त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यानच्या काळात विश्‍वस्तपदासाठी सुरू असलेली चुरस पाहून त्यांनीच यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. 

न्यायिक नोंद 
धर्मादाय सहआयुक्तांनी देवस्थानच्या विश्‍वस्तपदासाठी उमेदवारांच्या शिफारशी केल्या आहेत, त्यांची एक न्यायिक नोंद(ज्युडिशियल नोट) करण्याचे आदेश कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे. तरीही काही उमेदवारांसाठी थेट मंत्र्यांकडून शिफारशी, तर काहींनी दूरध्वनीवरून संपर्क साधून शिफारस केली आहे. 

Web Title: marathi news trambashwar temple trustee appoint

टॅग्स