महापालिकेत विनंती बदल्यांचा सिलसिला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नाशिक :  महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी शासनाला विनंती बदली करण्याचा अर्ज दिल्याने पालिकेत येत्या काळात शासनाकडून आलेल्या अधिकायांकडून विनंती बदल्या सुरु होण्याचा सिलसिला सुरु होण्याची शक्‍यता आहे. भोर यांनी विनंती बदलीसाठी का अर्ज दिला याबाबत स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला असला तरी गेल्या काही दिवसात आयुक्तांच्या काम करून घेण्याची पध्दत व लोकप्रतिनिधींचा दबाव यामुळेचं त्यांना विनंती बदलीसाठी अर्ज करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. 

मुख्य लेखाधिकारी भोर जुन 2016 मध्ये पालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ तीन वर्ष पुर्ण होण्यापुर्वीचं त्यांनी शासनाला विनंती अर्ज केल्याने पालिकेत सध्या सुरु असलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पालिकेत काम करताना तक्रारीं, बैठका यातचं वेळ जात असल्याने मुळ काम होत नाही. त्यात लोकप्रतिनिधींच्या दबावाला सामोरे जावे लागतं आहे. गेल्या महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भोर यांना सदस्यांकडून धारेवर धरण्यात आले होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून पालिकेच्या कारभाराला कंटाळून भोर यांनी एप्रिल महिन्यात शासनाकडे विनंती बदली साठी अर्ज दाखल केला होता. 
शासनाने भोर यांच्या विनंती अर्जावर निर्णय दिला नसला तरी नवी मुंबईचे लेखाधिकारी सुहास शिंदे यांची महापालिकेच्या मुख्य लेखाधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे समजते. दरम्यान विविध कर विभागाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी तीन वर्षाचा कालावधी पुर्ण केला आहे. मुख्य लेखा परिक्षक व प्रशासन विभागाचा प्रभारी कार्यभार असलेले महेश बच्छाव, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे हे शासनाचे अधिकारी लवकरचं पुन्हा शासन सेवेत जाण्याच्या मानसिकतेत असून आयुक्त मुंढे यांच्या कामकाजाच्या पध्दतीला कंटाळून बदली करून घेण्याची मानसिकतेत अधिकारी आल्याचे बोलले जात आहे. 
 
Web Title: marathi news transfer order