विनंती बदल्यांमध्ये तिघा पोलीस निरीक्षकांचे अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्यांचे वेध अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागलेले असताना, सातपूर, भद्रकाली आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत. तर म्हसरूळ, आडगाव, मुंबईनाका, गंगापूर या पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत आयुक्त नाराज असल्याने येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर उचलबांगडीची टांगती तलवार आहे. 

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्यांचे वेध अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागलेले असताना, सातपूर, भद्रकाली आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत. तर म्हसरूळ, आडगाव, मुंबईनाका, गंगापूर या पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत आयुक्त नाराज असल्याने येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर उचलबांगडीची टांगती तलवार आहे. 
  गृहविभागाकडून होणाऱ्या पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या बढत्या व बदल्या रखडल्या आहेत. परंतु त्यामुळे पोलीस आयुक्तालयांतर्गत बदल्याही थांबल्या. परंतु पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आयुक्तालयाअंतर्गत बदल्यांचे संकेत देत आठवड्याभरात त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी प्रशासन विभागाकडील एका पोलीस ठाण्यात सहा वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती, तसेच प्रशासनाकडे आलेले विनंती बदल्याचे अर्जांची माहिती मागवून त्यावर कामकाज सुरू केले आहे.

    आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यातील काही वरिेष्ठ पोलीस निरीक्षकांचा दोन वर्षांचा कालखंड पूर्ण होत असल्याने त्यांची बदली तर होणारच आहेच, शिवाय काही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे कामकाजाबद्दल तक्रारी असल्याने त्यांचीही बदली केली जाणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. 

विनंती बदलीसाठी तिघांचे अर्ज 
सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवले यांनी पोलीस आयुक्तांकडे बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे. विशेषत: श्री. आखाडे यांनी काही महिन्यांपूर्वीच सातपूरचा पदभार घेतला आहे. तर भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनीही विनंती बदली मागीतली आहे. मात्र त्यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत नव्हे तर धुळ्यात बदली पाहिजे आहे. गेल्यावर्षी त्यांच्याकडे मुंबई नाका पोलीस ठाण्याचा पदभार असताना भद्रकाली पोलीस ठाणे मागून घेतले होते. परंतु त्यांना भद्रकालीच्या हद्दीतील अवैध धंद्यावर चाप बसविता आला नाही. 

नंदवाळकर, देशमुख, पुजारी रडारवर 
दरम्यान, मुंबई नाका, म्हसरूळ आणि आडगाव या तीन पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत आयुक्तांकडे मोठ्याप्रमाणात तक्रारी आल्या आहेत. तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाबद्दलही नाराजी आहे. त्यामुळे मुंबईनाक्‍याचे सुनील नंदवाळकर, म्हसरुळचे सुभाषचंद्र देशमुख, आडगावचे सुनीलकुमार पुजारी यांच्यावर बदलीची टांगती तलवार आहे. तर काही महिन्यांपूर्वीच गंगापूरचा पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक के.डी. पाटील यांचीही बदली होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Web Title: marathi news transfer in process