ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांचा एल्गार! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्यातर्फे आज 'ट्रीपल तलाक' कायद्याच्या विरोधात महिलांचा मुक मोर्चाचे आयोजन केले होते.

जळगाव - 'ट्रिपल तलाक' हा मुस्लीम समाजातील मोठा प्रश्‍न नाही. मात्र राज्यकर्ते त्याला मोठा प्रश्‍न मानून देशाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून मुस्लीम समाजात फुट पाडत आहे. भारतीय घटनेने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तीन तलाक कायदा हा त्वरीत मागे घ्या! या मागणीसाठी आज जळगाव शहरासह तालुक्‍यातून आज पंधरा हजार मुस्लीम महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालवर मुक मोर्चा काढून ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात एल्गार केला. मोर्चात महिलांच्या हाती विविध घोषणांचे फलक हे सर्वांचे लक्ष वेधत होते. 

agitation

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्यातर्फे आज 'ट्रीपल तलाक' कायद्याच्या विरोधात महिलांचा मुक मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी चार वाजता खानदेश सेंट्रल मॉल येथून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाच्या नेतृत्व धुळे येथील डॉ. अरर्शिन बशिर, सुमैय्या नसीम सज्जद नुमानी यांनी केले. कोर्ट चौक, स्टेट बँक चौक, नवीन बस स्थानक कडून स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. दहा जणांचे महिला शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना 'ट्रिपल तलाक' कायदा विरोध, राष्ट्रपतींनी लोकसभेत केलेल्या भाषणात मुस्लीम महिला यांच्या विषयी केलेले उच्चारले उद्‌गाराबद्दल निषेध, केंद्राकडून हे बिल लादून मुस्लीम समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून या कायद्याला विरोध असून हा कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी पोलिस अधिक्षक दत्तात्रेय कराळे, तहसीलदार अमोल निकम, मुस्लीम संघटना नेते गफ्फार मलिक, करीम सालार उपस्थित होते.

Web Title: marathi news triple talaq muslim womens against agitation