केंद्रीय पाहणी समितीचा अहवाल गुलदस्त्यात! 

केंद्रीय पाहणी समितीचा अहवाल गुलदस्त्यात! 

जळगाव : येथील विमानतळावर नाइट लॅंडिंगची सोय नसल्याने सायंकाळी विमान येथील विमानतळावर न उतरविता थेट अहमदाबादला नेले जाते. यामुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे जळगाव विमानतळावर नाइट लॅंडिंगची सोय होणे गरजेचे आहे. यासंदर्भात नुकतीच दिल्ली येथील विमान प्राधिकरणाची समिती जळगाव विमानतळावर येऊन पाहणी करून गेली. मात्र, पाहणीचा अहवाल दिला नाही. तो दिल्लीला देण्यात येणार असल्याने समितीच्या अहवालात दडलय काय? हे समोर येण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. 
"ट्रू-जेट' कंपनीने जळगावात विमानसेवा सुरू केली. मात्र, विमानाची अनियमित वेळ, दुपारी मुंबईहून साडेचारला निघाल्यानंतर जळगावला साडेपाचला पोहोचताना खराब हवामानामुळे अनेकदा सायंकाळची विमाने जळगाव विमानतळावर उतरली नाहीत, ती थेट अहमदबादला नेण्यात आली. ज्या प्रवाशांना जळगावला महत्त्वाचे काम होते त्यांना कामात अडचणी येत होत्या. अनेकांनी जळगाव ते मुंबई व तेथून पुढील दौऱ्याचे नियोजन केलेले असायचे. मात्र, ऐनवेळी जळगावला येणारे विमान खराब हवामानामुळे रद्द झाल्याचा मेसेज प्रवाशांना येत असे. यामुळे प्रवाशांना पुढील प्रवासाचे नियोजन रद्दच करावे लागत होते. अनेक व्यापारी, उद्योजक, परदेशात नोकरीस असलेल्या नागरिकांना "ट्रू-जेट'च्या विमानसेवेचा कटू अनुभव आला आहे. यामुळे "ट्रू-जेट'चा प्रवास नको रे बाबा... अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. 
अनेकदा असे प्रसंग आल्याने विमान प्राधिकरण विभागाने (दिल्ली) लवकरात लवकर नाइट लॅंडिगची सुविधा जळगाव विमानतळावर व्हावी, यासाठी दिल्लीहून एक पाहणी समिती पाठविली. या समितीने रात्री व दिवसा विमानतळावरील विमानसेवेबाबत निरीक्षणे नोंदविली आहेत. उपलब्ध असलेल्या सोयींची पाहणी केली आहे. ती समिती पाहणीचा अहवाल दिल्लीला देणार आहे. त्या अहवालात काय उपाययोजना सांगितल्या आहेत त्यावर नाइट लॅंडिंगचे गणित अवलंबून असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com