तुकाराम मुंडेच ठरविणार "एलईडी' दिव्यांचे भवितव्य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नाशिक: जानेवारी महिन्यात राज्य शासनाने काढलेल्या एका आदेशानुसार एलईडी दिवे बसविणे बंधनकारक करताना केंद्र सरकारने सुचविलेल्या कंपनीकडूनचं दिवे खरेदीचे बंधन घातल्याने यापुर्वी नाशिक शहरात मंजुर झालेल्या साडे बारा हजारांहून अधिक एलईडी विषय संकटात सापडले आहे. प्रशासनाकडून महासभेचा ठराव व शासन आदेशाचा बाऊ केला जात असल्याने नगरसेवकांनी नागरिकांना दिलेले आश्‍वासन अडचणीत सापडले आहे त्यामुळे महापालिकेत नव्याने दाखल झालेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेवून एलईडी सह पाणीपुरवठा, रस्ते व अन्य नागरिकांच्या समस्यांवर स्थायी समिती सदस्य भेट घेवून व्यथा मांडणार आहेत. 

शहरात 85 हजार एलईडी दिवे फिटींग बसविण्याच्या प्रस्तावाला महासभेत मान्यता देण्यात आली आहे. ठराव अद्याप प्रशासनाच्या हाती पडला नसला तरी महासभेने मात्र यापुर्वी नगरसेवक निधीतून मंजुर झालेले एलईडी दिवे बसविण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहे. याच दरम्यान जानेवारी महिन्यात राज्य शासनाने आदेश काढून एलईडी दिवे केंद्र सरकारच्याच कंपनीकडून बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रशासनाने या निर्णयाचा बाऊ करतं यापुर्वीचे नगरसेवकांचे मंजुर प्रस्ताव बाजुला ठेवल्याने नगरसेवक संतप्त झाले आहे. नगरसेवक निधीतून एलईडी मंजुर झाले त्यात रद्द केल्यास नगरसेवक निधीचा प्रस्ताव मंजुर होणार नसल्याचे म्हणणे आहे. 

आयुक्तांची दांडी 
शिस्तिला महत्व देणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीच्या पहिल्याचं बैठकीला दांडी मारल्याने तयारी करून आलेल्या नगरसेवकांचा हिरमोड झाला. आयुक्त मुंढे यांच्या समोर प्रलंबित कामांचा पाढा वाचून प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामकाजाची पध्दत निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न होता. परंतू स्थायी समितीची बैठक सुरु असताना आयुक्तांनी गैरहजर राहून त्यांच्याच कार्यालयात काम केल्याने पदाधिकाऱ्यांना जुमानले नसल्याची भावना निर्माण झाली. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी शिक्षण विभागाचे अधिकारी नितीन उपासनी यांना बैठकीला वेळेत येण्याची तंबी दिली खरी पण त्याचबरोबर आयुक्तांच्या गैरहजेरीकडे दुर्लक्ष केले. 

वडाळा गावात रुग्णालय 
वडाळा गावात 25 खाटांचे रुग्णालय तयार झाले आहे. परंतू पुरेशा सोई सुविधा नसल्याने रुग्णालय बंद पडले. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकी मध्ये सुरक्षा रक्षक पुरविणे, ईलेक्‍ट्रिक कामे पार पाडणे व डॉक्‍टर पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय विभागाने पुढील आठवड्यात रुग्णालय सुरु करण्याचे निर्देश दिले. 
 
Web Title: marathi news tukaram munde