टायपिंग परीक्षेत 'डिलीट व बॅकस्पेस की' वापरण्यास परवानगी

दिगंबर पाटोळे
रविवार, 31 डिसेंबर 2017

वणी (नाशिक) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेत आता 'डिलीट किंवा बॅकस्पेस'चे बटन दाबल्यानंतर कमी होणाऱ्या गुणांची अट रद्द करण्यात आली आहे. दरम्यान संस्थाचालक व विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून संगणक टायपिंग परीक्षा अधिक सोपी झाल्याने परीक्षेत उत्तीर्णाचे प्रमाण वाढणार आहे.

वणी (नाशिक) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेत आता 'डिलीट किंवा बॅकस्पेस'चे बटन दाबल्यानंतर कमी होणाऱ्या गुणांची अट रद्द करण्यात आली आहे. दरम्यान संस्थाचालक व विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून संगणक टायपिंग परीक्षा अधिक सोपी झाल्याने परीक्षेत उत्तीर्णाचे प्रमाण वाढणार आहे.

शासनाच्या ३१ ऑक्टोबर २०१३ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे संलग्न असलेल्या शासन मान्यता प्राप्त वाणिज्य शिक्षण संस्थामध्ये संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रमातील विभाग १ मध्ये वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश असून विभाग २ मध्ये ई-मेल, पत्र, तक्ता आदींचा समावेश आहे. तर विभाग ३ मध्ये सात मिनिटांचा गती उताऱ्याचा समावेश आहे. विभाग २ मधील मधील प्रश्न सोडवतांना डिलीट किंवा बॅकस्पेसचे बटनाचा वापरण्यास मिळणाऱ्या गुणांवर कोणताही परीणाम होत नव्हता. मात्र विभाग ३ मधील गती उतारा टाईप करतांना डिलीट किंवा बॅकस्पेसचे बटन दाबल्यास तेवढे गुण कमी होत. त्यामुळे या अगोदर झालेल्या परीक्षांमधील निकालांत अनुत्तीर्णांचे प्रमाण साठ ते सत्तर टक्के असल्याने संगणक टायपिंगकडे आजवर विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. यामुळे संस्था चालकांमध्ये काळजीचे वातावरण होते. 

परीक्षा परीषदेने संगणक टायपिंग परीक्षेत डिलीट व बॅकस्पेसचा वापर करण्यास परवानगी द्यावी, पास होण्यासाठी प्रत्येक विभागात पन्नास टक्के गुणांची मर्यादा ४० टक्के करावी आदी मागण्या राज्यभरातील संस्थाचालक व विद्यार्थ्यांकडून होत होत्या. महाराष्ट्र राज्य टंकलेखन, लघुलेखन शासनमान्यता संस्थांची संघटना, मुंबई यांनी संस्थाचालकांची मागण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेकडे पाठपुरावा करीत परीषदेने यासाठी एक समिती नियुक्‍त केली होती. नाशिक जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश देवरे यांनी, 'या अगोदर झालेल्या संगणक टायपिंग परीक्षेचा निकाल खुपच कमी लागल्यामुळे संगणक टायपिंगकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. परीक्षा परीषदेने परीक्षेत 'डिलीट व बॅकस्पेस की' वापरण्यास परवानगी दिल्यामुळे संगणक टायपिंची परीक्षा आता सोपी झाली आहे, असे मत व्यक्त केले. 

समितीच्या अहवालानूसार परीक्षा परीषदेने संगणक टायपिंग परीक्षेत डिलिट किंवा बॅकस्पेस न वापरण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येवून तसा आदेश पारीत केला असल्याने संगणक टायपिंग परीक्षा अधिक सोपी झाली आहे. शासकीय संगणक टायपिेंग प्रमाणपत्र (जीसीसी-टीबीसी) ३०, ४० शब्द प्रती मिनीट मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेतील परीक्षांसाठी ही नवीन गुणदान पध्दत व डिलिट व बॅकस्पेस वापरण्याची परवानगी असणार आहे. मंगळवार, ता. २ पासून राज्यभरात सुरु होणाऱ्या संगणक टायपिंग परीक्षेत या नवीन निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच संस्थाचालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

Web Title: Marathi News Typing Exam Delete and Backspace Option