सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना सत्ता देणार का? उध्दव ठाकरेंचा सवाल

live
live

नाशिक- पंडीत नेहरूंनी तुरुंगात हाल अपेष्टा भोगल्या असतील तर त्यांना वीर म्हणायला मी तयार आहे. पण कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना "कायर' संबोधत त्यांचा अपमान केला.. राष्ट्रप्रेमींचा अपमान करणाऱ्यांना आपण सत्ता देणार का? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करतं अयोध्येत रामंदीर उभारण्याबरोबरचं काश्‍मिरातील 370 कलम रद्द करण्याचा पुन्हा एकदा सुर आवळला. 


    नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ अनंत कान्हेरे मैदानावर आज रात्आरी सभा झाली.त्यात ते बोलतं होते.. ते म्हणाले, भाजप सोबत पाच वर्षे मतभेद होते हे खरे परंतू देशाच्या मजबुतीसाठी एकत्र येण्याची गरजं असल्याने युती केली. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. पंतप्रधान पदासाठी इच्छुकांनी बिन बुडांची महाआघाडी केलीयं. त्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही. 50 वर्षे भ्रष्ट्राचारा शिवाय देशाला काहीचं मिळाले नाही. कॉंग्रेसने भ्रष्ट्राचाराचा कळस गाठला घोटाळ्यातही आदर्श दाखविण्याची त्यांची पध्दत आहे. बोफोर्स घोटाळा, कोळसा घोटाळा, जवानांची घरं, चिलखतं असे अनेक घोटाळे करूनही यानांच पुन्हा मते मागायला येताना लाज कशी नाही वाटतं? अशी टिका केली.

   नरसिंहराव यांनी अतिरेक्‍यांबरोबर बिर्याणी खाल्ली अन त्यांना सोडलं, पण सैनिकांच्या शौर्याचं आम्ही भांडवल केले नाही. पाकिस्तानात घुसून अतिरेक्‍यांना ठार मारले परंतू विरोधक नाही त्या शंका उपस्थित करून जवानांचं खच्चीकरण करतं असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. शेतकरी आत्महत्या करतं असताना शरद पवार इशरत जहॉंच्या घरी जाऊन सांत्वन करित होते. राजीव गांधी यांना शिव्या देणारे पवार, तोंडाला काळे फासेन पण पुन्हा कॉंग्रेस मध्ये जाणार नसल्याचे म्हणाले होते आता काय करताय अशी टिका त्यांनी केली. हिंदुत्वाचा प्रचार करण्यात गैर नाही, त्याला कारण म्हणजे देशाच्या भोवती हिरवा फास आवळला जात आहे. काश्‍मीर अस्थिर झाले आहे. पश्‍चिम बंगाल मध्ये बांगलादेशी कलाकार फिरदौस अहमद तृणमुल कॉंग्रेसचा प्रचार करतं आहे. त्यामुळे कचखाऊ नेतृत्व नसेल तर सैन्यही काही करू शकत नाही. नरेंद्र मोदी हेच देशाला कणखर नेतृत्व देवू शकतात असे ठाकरे यांनी सांगितले. काही लोक आता मफलर मधून गळा काढतं आहे. माझी काही चूक नसतांना अटक केल्याचा कांगावा करतं आहे. हेच भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूना वाचवलं म्हणून अटक करण्यास निघाले होते. आज जामिनावर आहात उद्या पुन्हा जेल मध्ये जावे लागणार असल्याचे ठाकरे म्हणाले.  उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज, खासदार संजय राऊत यांचे भाषण झाले. 

महाजनांचे हिंदु-मुस्लिम कार्ड 
पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मालेगाव मध्ये पाच लाख मुस्लिमांनी भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. परंतू ते पाच लाख एकत्र येत असतील तर आपण पंधरा लाख का एक येत नाही असा सवाल करतं निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुस्लिम कार्ड खेळले. 

उध्दव यांचाही "लाव रे व्हिडीओ' 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा लाव रे तो व्हिडीओ या वक्तव्याने गाजतं आहे. आजच्या सभेत उध्दव ठाकरे यांनी देखील लाव रे व्हिडीओ चा प्रयोग केला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत भाषण करताना सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्याची व्हिडीओ क्‍लिप होती. त्या क्‍लिपला अनुसरून सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना मतदान करणार का? असा सवाल त्यांनी केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com