उद्धव ठाकरे 12 ला जिल्ह्यात,  दिंडोरी, नांदगाव, येवल्यात प्रचारसभा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नाशिक ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 12 ऑक्‍टोबरला जिल्हा दौऱ्यावर 
येत आहेत. नांदगाव, दिंडोरी व येवल्यात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे नऊ उमेदवार आहेत. देवळाली वगळता शहरात एकाही मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नसल्याने ग्रामीण भागात त्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीतील माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत भरणार आहे. कॉंग्रेस, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेने त्यांच्या पक्षातील मोठे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. दिंडोरी, नांदगाव व येवला या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी श्री. ठाकरे दिवसभर नाशिकमध्ये राहतील. त्या दिवशी त्यांचा मुक्काम राहणार असल्याने शहराचे नियोजनदेखील त्यांच्याकडून होईल. पहिली सभा दिंडोरी मतदारसंघात दुपारी एकला , नांदगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी तीनला, तर सायंकाळी सातला येवल्यात सभा होईल. 13 ऑक्‍टोबरला मराठवाड्याकडे ते प्रचारासाठी रवाना होतील. 
नांदगावच्या सभेची आठवण 
सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्या वेळचे शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे जाहीर सभेचे नियोजन होते. सभेच्या तयारीसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, सभेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक सभा रद्द करण्यात आल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने 2009 च्या सभेची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news uddhav thakre