Vidhan sabha 2019 : आदिवासींचे आरक्षण काढणार हा विरोधकांचा अपप्रचार ः उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

धडगाव ः आदिवासी समाजाला घटनेने दिलेले आरक्षण काढून घेण्याचा विरोधकांचा अपप्रचार असून, कोणत्याही स्थितीत आरक्षण काढले जाणार नाही. रोजगाराअभावी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती केली जाईल. गेल्या तीस वर्षांपासून रखडलेला आदिवासींचा विकास युती शासन अधिक जोमाने करेल अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. 

अकरानी मतदार संघातीन उमेदवार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. श्री. ठाकरे यांचे सभास्थळी दोन तास उशिराने आगमन झाले तरी सकाळी साडेनऊ वाजेपासून आदिवासी पट्यातील महिला पुरूषांची मोठी गर्दी झाली होती. सभास्थळी आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख डॉ. विक्रांत मोरे, खासदार हिना गावित व भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी आदिवासी समाजाचे प्रतिक असलेला तिरकामठा देवून स्वागत केले. तत्पुवी श्री. रघुवंशी यांनी हा एक नंबरचा मतदार संघ आहे. शिवसेना उमेदवाराचा क्रमांकही एक नंबर आहे. यामुळे आपण विजयाचा एक नंबराचा संकल्प करून तशी भेट श्री. ठाकरे यांना देवूया असे आवाहन मतदारांना केले. 
श्री. ठाकरे यांनी आदिवासी भागाच्या रखडलेल्या विकासाचा व कॉंग्रेसच्या काळात झालेल्या दुर्दशेचा आढावा घेतला. आदिवासी जनतेला स्थानिक पातळीवरच रोजगार निर्मिती दिली जाईल. येथील पारंपारीक उत्पादनांना स्थानिक पातळीर प्रक्रिया करून रोजगार निर्मिती केली जाईल. आदिवासींचे कुपोषण होणार नाही अशी व्यवस्था युती शासन करेल; त्यासाठी जिल्हा रूग्णालयात सुपर स्पेशालिटी दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देवू. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news udhav thakre sabha dhdgaon aadivashi riservation