सटाण्यात युवक कॉग्रेसकडून पुतळा दहनातून उन्नाव घटनेचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सटाणा : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पीडितेला ठार मारण्याचा कट करणाऱ्या भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आज निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष व पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करत भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'पहले भाजपासे बेटी बचाओ फिर बेटी पढाओ' अशा प्रकारचे फलक हाती घेत घोषणाबाजी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news unnav insidence