अपात्र 20 हजार वनहक्क दाव्यांची फेरपडताळणी...अखेरची संधी 

residentional photo
residentional photo

नाशिक ः वनहक्कांच्या अपात्र केलेल्या 20 हजार 147 दाव्यांची पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हा वनहक्क कक्षातून मंगळवारी (ता.10) संबंधित दावे त्या त्या प्रांतधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. अपात्र ठरलेल्या दाव्यांत लाभार्थ्यांना योग्य ते पुरावे देऊन दावे पात्र करून घेण्यासाठी ही अखेरची संधी आहे. 

वनहक्क कायद्यानुसार वनजमिनी कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे नावावर करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यासाठी नाशिकमधून आंदोलनाची सुरवात झालेल्या याविषयात जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक वनहक्क दावे दाखल झाले. त्यातील 30 हजार प्रकरणे प्रशासनाने पात्र करीत लाभार्थ्यांना 46 हजार 626 एकर क्षेत्राचे वाटप केले. पण 20 हजार 147 प्रकरणांत लाभार्थ्यांनी 2005 पूर्वीचे अतिक्रमण असल्याची तसेच इतर योग्य ती कागदपत्रे पुरावा सादर करता न आल्याने ही प्रकरण अपात्र ठरविण्यात आली. दरम्यान याप्रकरणी न्यायालयाने अपात्र दाव्यांची पुर्नपडताळणी करत, लाभार्थ्यांना पुरावे सादर करण्याची संधी द्यावी. असे आदेश दिल्याने त्यानुसार पून्हा एकदा अपात्र ठरविलेल्या वनहक्क दाव्यांची फेरपडताळणी होणार आहे. 

अपात्र ठरविलेल्या वनहक्काचा प्रकरणांत सबळ पुरावे सादर करु न शकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी ही अखेरची संधी आहे. आदिवासी बांधवांना तालुकास्तरावर होणाऱ्या सुनावणीवेळी त्यांच्याकडील कागदपत्रांसह फेर पडताळणीप्रसंगी तालुकास्तवर उपस्थित राहून पुरावे सादर करता येणार आहे. त्यामुळे आपण किती आणि कोणत्या पध्दतीने हे अमंलबजवणी करतो याकडे आता साऱ्याचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे योग्य नियोजन करायला हवे असे वाटते.त्यानंतरच योग्य निर्णय घेता येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com