अटल, तुझे येवला जाना है और जानाही पडेगा..! 

संतोष विंचू
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

येवला : साधारणतः 1978 चा विषय आहे. येवला मर्चंट बॅंकेच्या नूतन वास्तूच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे येथील काही पदाधिकारी दिल्लीला गेले होते. मात्र, भरगच्च परदेश दौरे असल्याने अटलजींनी अडचण दाखवली, पण हेच शिष्टमंडळ जेव्हा संघाचे सरकार्यवाह (स्व.) भाऊराव देवरस यांच्याकडे गेले आणि हट्टाने आग्रह केला. त्यावर भाऊरावांनी तत्काळ अटलजींना दूरध्वनी करून सांगितले, की "तू हर बार विदेश का सोच करेगा तो देश का कौन सोचेगा?... अटल, तुझे येवला जाना है और जानाही पडेगा...' आणि आपल्या गुरूचा आदेश प्रमाण मानून अटलजी येवल्याला आले. 

डिसेंबर 1978 मध्ये तत्कालीन अध्यक्ष मदनलालजी हेडा, बॅंकेचे तत्कालीन संचालक (कै.) प्रभाकरदादा कासार, (कै.) श्रीधरभाऊ गायकवाड, (कै.) शरद पटणी, (कै.) भाऊलाल लोणारी, (कै.) जगन्नाथ सोनवणे यांच्यासह मोतीकाका परदेशी, सुरेशभाई गुजराथी व मीही दिल्लीला गेलो होतो;

 परराष्ट्रमंत्री असल्याने व परदेश दौऱ्याच्या भरगच्च कार्यक्रमामुळे त्यांनी अत्यंत विनम्रपणे नकार दिला. आम्ही सर्वजण दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गेलो. सुदैवाने संघाचे सरकार्यवाह (स्व.) भाऊराव देवरस कार्यालयात होते. आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना आमचा मनोदय सांगितला. त्यावर अटलजींचे गुरू असलेल्या (स्व.) भाऊराव यांनी तत्काळ अटलजींना दूरध्वनी करून स्पष्ट आदेश दिला, की "तू हर बार विदेश का सोच करेगा तो देश का कौन सोचेगा?... अटल, तुझे येवला जाना है और जानाही पडेगा.' आणि मग आम्ही पुन्हा अटलजींची भेट घेतली तेव्हा ते सर्वांकडे हसत पाहत म्हणाले, ""आप सभी तो मेरे गुरू के यहॉं जाकर आये हो। अब तो गुरू के आदेश का मुझे पालन करनाही होगा। अब आप निश्‍चिंत हो कर जाओ मैने कार्यक्रम का निमंत्रण स्वीकार लिया है...' त्यानुसार 19 मे 1979 ला बॅंकेच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन अटलजींच्या हस्ते झाले. 

येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व मर्चंट बॅंकेचे संचालक धनंजय कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता. 16) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या येवल्याशी संबंधित असलेल्या आठवणींना उजाळा दिला. अटलजी सर्वप्रथम येथे 4 मे 1970 ला आले. त्या वेळी रात्री शनी पटांगणात त्यांची सभा झाली. येथील जनसंघाचे दिवंगत नगराध्यक्ष (कै.) केशवरावजी पटेल यांचे आकस्मिक निधन झाले. त्या वेळी येवला मुक्कामी असताना अटलजी हे पटेल परिवाराच्या सांत्वनासाठी पहाटे साडेपाचला त्यांच्या निवासस्थानी पायी चालत गेले होते. या आठवणींना श्री. कुलकर्णी यांनी उजाळा दिला. 
 
Web Title: marathi news vajipai passaway