संपर्क फॉर समर्थन' अभियानातील भेटीतून फायदा : भाजप प्रदेश अध्यक्ष दानवे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

वाकोद (ता. जामनेर) : भाजपाच्या संपर्क फॉर समर्थन या अभियना अंतर्गत आम्ही चार हजार कार्यकर्ते सहभागी असून विविध क्षेत्रात उच्च कामगिरी केलेल्या महत्वाच्या लोकांना आम्ही भेट देऊन भाजप सरकारने गेल्या 48 महिन्यात केलेली कमगिरिची माहिती देत आहोत. या अभियानातील भेटीतुन आम्हाला ज्या महत्वपूर्ण सुचना मिळतात, आमच्यासाठी महत्वाच्या असतात; असे मत भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पळासखेडा (ता सोयगाव) येथील कविवर्य ना धो महानोर यांच्या निवासस्थानी केलेल्या भेटी प्रसंगी व्यक्त केले 

यावेळी त्यांनी मोदी सरकार ने चार वर्षात केलेल्या कामाची माहिती कविवर्य महानोराना दिली. श्री. दानवे यांनी सांगितले, की शेती आणि शेतकरी हा कविवर्य महानोर यांचा आवडता विषय असून त्यांनी आम्हाला खुप चांगली माहिती दिली. काही सुचनादेखील केल्या. त्यांच्या सुचनांचा निश्‍चित विचार होईल, कवी महानोर आमचे आदर्श आहेत यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यामधे शेतकऱ्यांना पूर्वी पन्नास टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची त्यामधे बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. परंतु मोदी सरकारच्या काळात 33 टेक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते असेही श्री दानवे यांनी सांगितले. जोपर्यंत शेतीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक होत नाही, तोपर्यंत शेतीला न्याय मिळणार नाही. तसेच शेतकाऱ्यांवरील भार कमी होणार नाही. त्यासाठी छोटे नाले, माथा ते पायथा असे जलसंधारणाची कामे करणे आवश्‍यक असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत सिल्लोड मतदार संघाचे माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, सुरेश बनकर तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते 

शेतकरी आत्महत्या विषयी व्यक्त केली खंत 

संपर्क फॉर समर्थन अभियानात भेटीसाठी आलेल्या भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर पद्मश्री कविवर्य ना. धो. महानोर शेतकऱ्यांची व्यथा तसेच होत असलेल्या आत्महत्या याविषयी खंत व्यक्त करीत शेतकरी वाचविण्यासाठी तो पुढे टिकविण्यासाठी जलसंधारण महत्त्वाचे आहे. जलसंधारणा शिवाय कुठलाही पर्याय नाही असे मत महानोर यांनी व्यक्त केले. 

Web Title: marathi news vakod jalgaon bjp danve mahanor samprk samrthan