esakal | धान्य न देणाऱ्या वनोलीच्या रेशन  दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द - पुरवठा अधिकारी  सूर्यवंशी

बोलून बातमी शोधा

ration

शासनाने धान्य वितरण करताना ई पॉस मशिनवर "थम'चे अधिकार लाभार्थ्यांना ऐवजी रेशन दुकानदारांना दिल्याने रेशन दुकानांतून धान्याचा काळा बाजार होतो, लाभार्थ्यांच्या वाटणीचे धान्य त्यांना मिळत नाही, मिळाले तर अपुरे मिळते याबाबत "सकाळ'न वारंवार वृत्त दिले आहे. यामुळे आतापर्यंत आठ रेशन दुकानदारांचे प्राधिकारपत्र रद्द झाले आहे.

धान्य न देणाऱ्या वनोलीच्या रेशन  दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द - पुरवठा अधिकारी  सूर्यवंशी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगावः रेशन कार्ड धारकांना धान्य कमी देणे, यादीत नाव असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे, रेशन दुकानदारास विचारणा केली असता समिती सदस्यांना धमकी देणे आदी प्रकारामुळे मौजे वनोली (ता.यावल) येथील अंबादास धनसिंग पाटील यांचे रेशन दुकान क्रमांक 79 यांचे प्राधिकार पत्र रद्द करण्याची कारवाई आज जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांची तपासणी मोहीम सुरूच राहील असेही श्री.सूर्यवंशी यांनी सांगितले. 

आर्वजून वाचा ः अरे बापरे..तोंडाला मास्क लावला नाहीतर 500 रुपये दंड - जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 
शासनाने धान्य वितरण करताना ई पॉस मशिनवर "थम'चे अधिकार लाभार्थ्यांना ऐवजी रेशन दुकानदारांना दिल्याने रेशन दुकानांतून धान्याचा काळा बाजार होतो, लाभार्थ्यांच्या वाटणीचे धान्य त्यांना मिळत नाही, मिळाले तर अपुरे मिळते याबाबत "सकाळ'न वारंवार वृत्त दिले आहे. यामुळे आतापर्यंत आठ रेशन दुकानदारांचे प्राधिकारपत्र रद्द झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभाग लाभार्थ्यांच्या आलेल्या तक्रारींवरून संबंधित दुकानदार, त्यांचे लाभार्थ्यांशी चौकशी करीत आहे. लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहे. 

वनोली येथील दुकानदारांबाबत वरील प्रकारच्या विविध तक्रारी होत्या. यावल तहसीलदारांना दुकानदार पाटील यांना नोटीस बजावून वरील बाबींबाबत खुलासा घेऊन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. खुलाशात दुकानदाराने मी आत्महत्येची धमकी दिलेली नाही, नियमित धान्य वाटप करतो, शासनाच्या अटींचे पालन करतो ई पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करतो असे म्हटले आहे. 

नक्की वाचा ः  एकच चुक अन्‌ अमळनेर 'हॉट स्पॉट'..

"कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर धान्य वाटप न होण्याच्या तक्रारी 
गंभीर आहे. दुकानदाराने सादर केलेला खुलासा सयुक्तिक नाही. यामुळे वितरणाचे विनियमन आदेश 1975 मधील तरतुदींचा व प्राधिकारपत्रातील अटी व शर्तीचा भंग केल्याने दुकानदार अंबादास पाटील यांचे दुकान क्रमांक 79 चे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. 

कोसगावला दुकान जोडले 
दुकान क्रमांक 79 हे आता मौजे कोसगाव येथील स्वस्त दुकानदार सुभाष तायडे यांच्या स्वस्त 
धान्य दूकानास तत्काळ जोडण्याची कार्यवाही करण्यास यावल तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.