अतिक्रमण विभागाकडून दोन ट्रक भाजीपाला जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नाशिक- व्यापाऱ्यांच्या लॉबिंग मुळे शेतमालाला क्षुल्लक भाव मिळतं असतांना दोन पैसे अधिक मिळविण्यासाठी रस्त्याच्या कडेला भाजीचे दुकान लावून किमान उत्पादन खर्च पदरात पाडून घेणाऱ्या शेतकऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची वक्रदृष्टी पडली. रस्त्यावरून आज तब्बल दोन ट्रक भाजीपाला जप्त करण्यात आला.
  फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याचे समर्थन केले असले तरी शासनानेचं एका आदेशान्वये शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी भुखंड उपलब्ध करून देण्याच्या सुचना महापालिकेला केल्या असताना त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. 

वाढत्या नागरीकरणामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात रोजगार नसल्याने दुकाने लावून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने रस्त्यावर दुकाने लावून पोट भरण्याचे काम होत आहे. रस्त्यावर थाटलेली दुकाने अतिक्रमणात मोडतं असल्याने या विभागाकडून तातडीने ती दुकाने उचलली जातात. परंतू तरीही अतिक्रमण नियंत्रणात येत नसताना आता कामाचा दिखावा करण्यासाठी अतिक्रमण विभागाने वेगळीचं शक्कल लढविली आहे
 
Web Title: marathi news vegetable in nashik