कर्तव्य अन् सत्कार्याचा प्रत्यय...जप्त भाजीपाला दिला वसतिगृहाला

residentional photo
residentional photo

जुने नाशिक ः पश्‍चिम विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मोहिमेत जप्त करण्यात आलेला भाजीपाला वसतिगृहात देण्यात आला. एकीकडे नोकरीच्या कर्तव्याचा भाग म्हणून विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचा माल जप्त केला, तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकी म्हणून तो वसतिगृहात देऊन आदर्श निर्माण करण्याचे काम महापालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. 

पथकाच्या योग्य निर्णयाचे कौतुक

पश्‍चिम विभाग अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी (ता. 10) सराफ बाजारासह बोहरपट्टी भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. रस्त्यास अडथळा ठरतील अशा भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानाचे अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला. या वेळी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जप्त केला. हा जप्त माल खरेतर महापालिका गोडाउनमध्ये जमा करते. पण भाजीपाला नाशवंत आहे. गोडाउनमध्ये भाजीपाला जमा केला तर दुसरऱ्या दिवशी तो माल सडून खराब होतो. त्यानंतर तो फेकून द्यावा लागेल. त्यापेक्षा निराधारांना त्याचा उपयोग होईल. त्यांचा काही दिवसांचा भाजीपाला खरेदीचा प्रश्‍न सुटेल.

सर्वांचा विचारविनियम

 कर्तव्य आणि सत्कार्य दोन्ही कार्य केल्याचे समाधान मिळेल या भावनेतून अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी कारवाई करत नोकरीतील कर्तव्य पार पाडले. रमाबाई आंबेडकर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करत सामाजिक बांधिलकी जपली. या वसतिगृहाचे सध्या काम सुरू असल्याने विद्यार्थिनींना दहिपूल परिसरातील हुंडीवाला लेन येथील महापालिकेच्या बंद असलेल्या शाळेत स्थलांतरित केले आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन जप्त केलेला भाजीपाला दिला.  

अतिक्रमण विभाग नेहमीच टिकेचा विषय बनला आहे. हा विभाग साहित्य जप्त केल्यानंतर त्याची रवानगी थेट आपल्या गोडावूनमध्ये करत असतो मात्र वसतिगृहात मदत देऊन त्यांनी एक दातृत्वाची भावना दाखवली आहे.त्यामुळे त्यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे हे काम करतांना कर्मचारी आणि अधिकारी यांचा उत्साह दांडगा दिसला..
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com