वाहतूक नियम अन्‌ हेल्मेटविषयीची जागृती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नाशिकः महिलांचा हक्काचा आणि स्वाभिमानाचा आजचा दिवस भगिनींनी अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. "वॉव' समूहातर्फे "राईड विथ प्राईड' या संकल्पनेवर आधारित काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून वाहतूक नियम अन्‌ हेल्मेटविषयीची जागृती करण्यात आली. ठक्कर डोम ते ए. बी. बी.-जेहान सर्कल, जूना गंगापूर नाका, कॉलेज रोड असा रॅलीचा मार्ग राहिला.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते रॅलीची सुरवात झाली. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, नगररचनाच्या सहाय्यक संचालक प्रतिभा भदाणे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावीत, सदस्या सिमंतिनी कोकाटे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, तुलसी स्टुडिओच्या मेघा टिबरेवाल, अनिता टिबरेवाल, योग शिक्षिका किरण चांडक, मराठी साहित्य परिषद सदस्या कामिनी तनपुरे, "वॉव' समूहाच्या अश्‍विनी न्याहारकर आदी उपस्थित होते. वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली. पर्यावरण संवर्धन, स्त्री-पुरुष समानता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक सुरक्षा आदीविषयक घोषवाक्‍यांचे फलक महिलांनी हातामध्ये घेतले होते. राष्ट्रीयस्तरावरील 30 क्रीडापटूंचा रॅलीत सहभाग राहिला. वाहतूक नियम, हेल्मेट विषयक जागृतीचे वेगळेपणा या उपक्रमातून सिद्ध केले आहे, असे डॉ. सिंगल यांनी सांगितले. 
रॅलीच्या समारोपसाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुरेखा पाटील, डॉ. पाटील, डॉ. ए. के. पवार, पवार इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. अपर्णा पवार, इम्पायर फूडस्‌ संचालक कांता राठी, मिसेस इंडिया विजेत्या शिल्पी अवस्थी, मास्टर शेफ इंडिया मिनू धाम, गौरी पांडे, सौ. भदाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आय. एम. ए. च्या डॉ. नलिनी बागूल, अर्चना गिते, नुपूर पाटील, भारती वाघ, हर्षा कश्‍यप, पुष्पा धोंगडे, रेणुका भामरे, सीमा पाटील, क्रांती न्याहारकर, पल्लवी तांबे, मनीषा पाटील, सपना बुटे, सुषमा जाधव, शीतल साळी, उज्वला बोधले, मंजुषा पाटील, राजश्री निमकर, वैशाली मराठे आदींचा सन्मानार्थींमध्ये समावेश राहिला. प्रबोधिनी संस्थेला वीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली. 

Web Title: marathi news vehicle rule and helmet