पशु वैदयकिय विभागातल्या रिक्त पदांमुळे पशुपालकांच्या समोर समस्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

नांदगाव- तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील १८ वैद्यकीय दवाखान्यांचा भार केवळ ६ डॉक्टरांवर आला आहे. तालुक्यात एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा विमा असलेले जनावर दगावल्यास शवविच्छेदन करून दाखला देण्यासाठी एक हि पशु वैद्यकीय अधिकारी उरलेला नसल्याने येथील पशुधनाचे काय होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

   तालुक्यात ८७००० मोठी जनावरे १ लाख ६४ हजार शेळ्या मेंढ्या आहेत. श्रेणी १ चे नऊ व श्रेणी २ चे नऊ असे १८ दवाखाने येथे आहेत. आज श्रेणी १ चे पशुधन विकास अधिकारी यांची सहा पदे रिक्त असून तीन अधिकारी, नऊ जणांचा भार वाहात होते. तालुक्यात सर्वत्र पसरलेल्या या दवाखान्याचे कॉल आल्यांनतर खूप धावपळ होत असे. ऊशीर झाला तर पशु मालकाच्या रोषाला तोंड द्यावे लागायचे. अशी गंभीर परिस्थिती असतांना एका पशुधन विकास अधिकाऱ्याने राजीनामा दिला व उरलेल्या दोघांनी सोयीनुसार बदल्या करून घेतल्या. त्यामुळे श्रेणी एक च्या सहा दवाखान्यामध्ये एक ही पशु वैद्यकीय अधिकारी उरलेला नाही. श्रेणी २ च्या नऊ पैकी सहा दवाखान्याची पदे रिक्त आहेत. फक्त तीन दवाखान्यात कर्मचारी आहेत. त्यामुळे वरील जनावरांच्या संख्येचे आरोग्य श्रेणी दोन च्या दवाखान्यावर अवलंबून राहणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news VETERINARY DOCTOR