Vidhan sabha : जिल्ह्यातील चार मतदारसंघांत "हॉट लढती' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

जळगाव : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. सुरवातीला महायुतीला सोपी वाटणारी निवडणूक प्रचाराच्या काही दिवसांनंतर तुल्यबळ होत असल्याचे चित्र निर्माण झाले. यातच जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांच्या "हार्टबीट' वाढविल्या असून, त्यामुळे काही ठिकाणच्या लढती अत्यंत चुरशी होत आहेत. त्यांच्याकडे "हॉट लढती' म्हणून पाहिले जात आहे. या लढतींमध्ये त्या मतदारसंघातील जातीय समीकरण, धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे विजयाचे गणित मांडले जाऊ लागले आहे. 

जळगाव : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. सुरवातीला महायुतीला सोपी वाटणारी निवडणूक प्रचाराच्या काही दिवसांनंतर तुल्यबळ होत असल्याचे चित्र निर्माण झाले. यातच जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांच्या "हार्टबीट' वाढविल्या असून, त्यामुळे काही ठिकाणच्या लढती अत्यंत चुरशी होत आहेत. त्यांच्याकडे "हॉट लढती' म्हणून पाहिले जात आहे. या लढतींमध्ये त्या मतदारसंघातील जातीय समीकरण, धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे विजयाचे गणित मांडले जाऊ लागले आहे. 

अमळनेर ः शिरीष चौधरी विरुद्ध अनिल भाईदास 
अमळनेर मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी अपक्ष आमदार शिरीष चौधरी विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे अनिल भाईदास पाटील यांच्यात सरळ लढत आहे. या मतदारसंघात सात उमेदवार आहेत. मात्र, लढत शिरीष चौधरी विरुद्ध अनिल भाईदास पाटील यांच्यात होत आहे. स्थानिक रहिवासी मुद्यावर ही निवडणूक लढविली जात आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. आघाडी व युतीने या ठिकाणी जोरदार कंबर कसली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोण विजयी होणार? याकडेच अधिक लक्ष आहे. 

एकूण मतदान : 2 लाख 92 हजार 
जातीय संख्या (अंदाजे) 
मराठा : 38 टक्के 
माळी : 9 टक्के 
मुस्लिम : 11 टक्के 
भिल्ल : 13 टक्के 
दलित : 9 टक्के 
बंजारा : 8 टक्के 
अन्य : 13 टक्के 

मुक्ताईनगर ः रोहिणी खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील 
तीस वर्षांपासून एकनाथराव खडसेंच्या रूपात आमदार असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघाकडे खडसेंना उमेदवारी नाकारल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कन्या रोहिणी खडसेंना निवडून आणण्याचे आव्हान खडसेंसमोर आहे. "राष्ट्रवादी'ने अधिकृत उमेदवारास माघार घ्यायला लावत आपले बळ शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटलांमागे उभे केल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. चार दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातच खरी लढत होत आहे. 

एकूण मतदार : 2 लाख 97 हजार 
मराठा : 33 टक्के 
लेवा पाटीदार : 17 टक्के 
मुस्लिम : 14 टक्के 
दलित : 11 टक्के 
कोळी : 9 टक्के 
गुजर : 8 टक्के 
अन्य : 8 टक्के 

रावेर ः हरिभाऊंविरोधात शिरीष चौधरींचे आव्हान 
रावेर- यावल मतदारसंघात विद्यमान आमदार हरिभाऊ जावळेंविरोधात कॉंग्रेस उमेदवार शिरीष चौधरी अशी ही लढत आहे. दोघेही तुल्यबळ उमेदवार असले, तरी मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय अनिल चौधरी यांनीही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली असून, त्यामुळे लढतीत रंगत आली आहे. अन्य उमेदवार रिंगणात असले, तरी अनिल चौधरी किती मते घेतात? त्यावर निकालाचे गणित अवलंबून असेल. तूर्तास या तिरंगी लढतीकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 

एकूण मतदार : 2 लाख 91 हजार 
लेवा पाटीदार : 22 टक्के 
मराठा : 17 टक्के 
मुस्लिम : 19 टक्के 
दलित : 15 टक्के 
कोळी : 7 टक्के 
तडवी : 6 टक्के 
माळी : 6 टक्के 
अन्य : 8 टक्के 

एरंडोल ः डॉ. सतीश पाटील विरुद्ध चिमणराव पाटील 
एरंडोल- पारोळा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना किती मते पडणार? याकडेच लक्ष आहे. यावेळी मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडेच लक्ष आहे. 

एकूण मतदान : 2 लाख 78 हजार 957 
मराठा : 26.6 टक्के 
राजपूत : 6.1 टक्के 
मुस्लिम : 8.5 टक्के 
माळी : 7.2 टक्के 
दलित : 7.6 टक्के 
भिल्ल : 6.3 टक्के 
बंजारा : 3.04 टक्के 
अन्य : 31 टक्के 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan sabha electin jalgaon district 4 matdar sangh