Vidhan sabha : मतदान प्रक्रियेसाठी वीस हजार कर्मचारी नियुक्त 

Vidhan sabha : मतदान प्रक्रियेसाठी वीस हजार कर्मचारी नियुक्त 

जळगाव ः विधानसभा निवडणुका सुरळीत, शांततेत आणि निर्भयपणे पार पडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांत सुमारे 20 हजार 230 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलिस, केंद्रीय पोलिसांचे तीन हजार 835 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी 66 स्थिर पाहणी पथके, 11 व्हिडिओ पाहणी पथके, 22 व्हिडिओ सर्वेक्षण पथके आणि 11 खर्च नियंत्रण पथके, 66 भरारी पथके तैनात आहेत, तसेच "मायक्रो ऑर्ब्झव्हर्स'ही नेमण्यात आले आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या गावात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणुकीसाठी मतपत्रिकेचा वापर होणार नाही. कारण, मतपत्रिकेत चुकीचे मतदान आणि वेळखाऊपणा जास्त असतो. इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन हे विश्वासार्ह आहे. आपले मत कोणाला गेले, हे दर्शविण्यासाठी त्यास "व्हीव्हीपॅट' मशिनचा आधार आहे. 

मतदानासाठी जिल्ह्यात चार हजार 321 कंट्रोल युनिट, चार हजार 307 ईव्हीएम आणि चार हजार 667 व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदान यंत्रे व कर्मचारी ने-आण करण्यासाठी एक हजार 411 वाहने असतील. सर्व मतदारसंघांतील मतदान यंत्रांची सरमिसळ करण्यात आली असून, कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान यंत्रे निवडणूक निरीक्षक व उमेदवार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सीलिंग व सेटिंग करून "स्ट्रॉग रूम'मध्ये ठेवण्यात आली आहेत. मतमोजणी विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात एक हजार 254 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

असे आहे मतदारसंघनिहाय मतदार 
जळगाव जिल्ह्यात एकूण 34 लाख 47 हजार 184 मतदार आहेत. 
मतदारसंघ-- मतदारसंख्या 
चोपडा-- 3 लाख 7 हजार 760 
रावेर-- 2 लाख 92 हजार 763 
भुसावळ --3 लाख 7 हजार 5 
जळगाव शहर-- 4 लाख 219 
जळगाव ग्रामीण-- 3 लाख 14 हजार 604 
अमळनेर-- 2 लाख 92 हजार 969 
एरंडोल-- 2 लाख 79 हजार 339 
चाळीसगाव-- 3 लाख 41 हजार 456 
पाचोरा--3 लाख 12 हजार 962 
जामनेर--3 लाख 8 हजार 468 
मुक्ताईनगर--2 लाख 89 हजार 639 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com