जिल्ह्यात विधानसभेसाठी 148 उमेदवार रिंगणात, 64 उमेदवारांची समजूत काढण्यात यश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज सोमवारी (ता.7) 212 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता जिल्ह्यातील  15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात राहिले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहीती दिली. 

नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज सोमवारी (ता.7) 212 उमेदवारांपैकी 64 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता जिल्ह्यातील  15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात राहिले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहीती दिली. 

उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या दिवशी जिल्ह्यातील निवडणूक चित्र स्पष्ट झाले. सर्वाधीक 19 उमेदवार पश्‍चिम मतदार संघात असतील एका ईव्हीएम यंत्रावर 15 उमेदवार व नोटा अशा 16 उमेदवारांची सोय होत असल्याने याठिकाणी दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहे. सर्वाधीक 13 उमेदवारांनी आज नांदगाव मतदार संघात माघारी घेतली. निवडणूकीचे कर्तव्य बजावणाऱ्या 19 हजार पुरुष कर्मचाऱ्यांसाठी 20 हजारावर टपाली मतदानाची सोय केली जाणार आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्राची संख्या 4579 असेल तर पहिल्या मजल्यावरील 196 मतदार केंद्र खालच्या मैदानावर आणली जाणार असून त्यासाठी 64 ठिकाणी तात्पुरत्या मतदान केंद्राची सोय केली 
जाणार आहे. 

संवेदनशिल केंद्राची वाढ 
जिल्ह्यात ग्रामीण 48 शहरात 60 याप्रमाणे 108 संवेदनशील केंद्र असून त्यात, निवडणूक लढविणाऱ्या 148 उमेदवारांचे मतदान असलेले 148 मतदान केंद्र क्रिटीकल म्हणून वाढणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात क्रिटीकल मतदान केंद्राची संख्या 256 झाली आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्तासह प्रत्येक केंद्रावर अत्यावश्‍यक 15 सुविधांची सोय केली जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यत 25265 पोस्टर काढले आहे. 11 आचारसंहितेच्या तक्रारी आल्या आहेत. तर सोशल मिडीयावरील प्रचाराचा  खर्च धरण्याची तरतूद झाल्याने प्रा.देवयानी फरांदे यांच्या फेसबुक पेजचा खर्च निवडणूक खर्चात धरला जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan sabha election