पंचवीस हजार मतदारांनी नाकारले उमेदवारांना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

जळगाव ः भारतीय संविधानाने सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे. तो सर्वांत चांगली लोकशाही येण्यासाठी. मात्र लोकप्रतिनिधींकडून समस्या न सोडविल्या जाणे, मतदारांची अडलेली कामे उमेदवारांनी न करणे, प्राथमिक सुविधा देण्यापासून वंचित ठेवणे या- ना त्या विविध कारणांनी नागरिक मतदानाला जातात मात्र "नोटा' हे बटन दाबून रिंगणात असलेल्या उमेदवारांना नाकारतात. जळगाव जिल्ह्यात 25 हजार मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे. 

जिल्ह्यात अकरा जागांसाठी शंभर उमेदवार रिंगणात होते. मात्र उमेदवार नाकारण्याकडे मतदारांचा कल वाढत आहे. मतदानाची टक्‍केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने जनजागृतीही केली. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीवर पावसाचे सावट होते. यामुळे अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडले नसल्याचे चित्र दिसून आले. जळगाव शहरात सर्वांत जास्त जवळपास पाच हजार मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे. 

तालुकानिहाय नोटाची आकडेवारी 
अमळनेर--1503 
रावेर--1946 
पाचोरा--1724 
जामनेर--2105 
एरंडोल--1995 
मुक्ताईनगर--1806 
चोपडा--2175 
चाळीसगाव--1677 
जळगाव शहर--4998 
जळगाव ग्रामीण-2382 
भुसावळ--2377 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan sabha election 25 thousand voter NOTA