live photo
live photo

जळगाव जिल्ह्यात पाच टक्‍के मतदान; रावेरला पाच यंत्र बदलविली 

जळगाव ः विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया आज सुरू आहे. या प्रक्रियेतील पहिल्या दोन तासात जिल्ह्यात केवळ पाच टक्‍के मतदान झाले आहे. सकाळी रिमझिम पाऊस सुरू असल्याने मतदारांनी येणे टाळले आहे. बहुतांश मतदान केंद्रावर केवळ कर्मचाऱ्यांव्यतिरिक्‍त कोणीच दिसून येत असल्याची स्थिती होती. मात्र नऊनंतर मतदारांची गर्दी होवू लागली होती. 
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अकरा मतदार संघातून शंभर उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात याकरीता 6 हजार 666 केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रियेला शांततेत सुरवात झाली. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची संख्या देखील कमी होती. यामुळे पहिल्या दोन तासात केवळ पाच टक्‍केच मतदान होवू शकले आहे. तर जळगाव शहरात 2.14 टक्‍के मतदान झाले. यात रावेर येथील मतदान केंद्र क्रमांक 114 वर व्हीव्हीपॅटमुळे पऊण तास उशिराने मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. 

आठ यंत्रांमध्ये बिघाड 
रावेर तालुक्‍यात मतदान यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार घडला. रावेर येथील आठ ठिकाणी मतदान यंत्र बदलण्यात आली असून, यात मतदानांच्यावेळी तीन ठिकाणी व चाचणीच्या वेळी पाच ठिकाणी यंत्रे बंद पडल्याचा प्रकार घडला. शिवाय रावेर तालुक्‍यातील कुंभारखेडा येथील केंद्र क्रमांक 132 वरील यंत्रणा पहिलेच मतदान केल्यानंतर यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार घडला. यामुळे मतदान प्रक्रियेला उशिराने सुरवात झाली. 

मतदारांचे औक्षण अन्‌ स्वागत 
मतदानाचा टक्‍का वाढावा याकरीता आदर्श आणि सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. यातील रावेर येथील यशवंत विद्यालयात केवळ महिलांनी चालविलेल्या सखी मतदान केंद्र सुशोभित करण्यात आले आहे. तर लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आली असून चिमुकल्या मुलींच्या मतदारांचे औक्षण करून प्रवेश देत आहेत. तर जळगाव शहरातील आदर्श मतदान केंद्र क्रमांक 95 ए 13 या केंद्रावर सकाळी सातला आलेल्या प्रथम आलेल्या मतदारांचे बुके देवून स्वागत करण्यात येत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com