Vidhan sabha : मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण; आज साहित्य वाटप; उद्या मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

जळगाव ः जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 मतदारसंघांसाठी सुमारे दोन हजार 107 ठिकाणी तीन हजार 532 मतदान केंद्रांची, तर 54 सहायकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी व वेळेत मतदान पूर्ण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात 900 ते 1400 मतदार मतदान करू शकतील. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे वीस हजारांवर कर्मचारी नेमण्यात आले आहेत. उद्या (ता. 20) सकाळी दहापासून त्यांना मतदान साहित्यवाटप होईल. तेथूनच त्यांना थेट मतदान केंद्रात रवाना केले जाईल. जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे. 

जळगाव ः जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 मतदारसंघांसाठी सुमारे दोन हजार 107 ठिकाणी तीन हजार 532 मतदान केंद्रांची, तर 54 सहायकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी व वेळेत मतदान पूर्ण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात 900 ते 1400 मतदार मतदान करू शकतील. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे वीस हजारांवर कर्मचारी नेमण्यात आले आहेत. उद्या (ता. 20) सकाळी दहापासून त्यांना मतदान साहित्यवाटप होईल. तेथूनच त्यांना थेट मतदान केंद्रात रवाना केले जाईल. जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे. 

जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत. यात चोपडा (अनुसूचित जमाती), रावेर, भुसावळ (अनुसूचित जाती), जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय एक याप्रमाणे 11 सखी मतदान केंद्रे असतील. 11 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 36 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. 11 केंद्रांत नेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने तेथे पोलिस दलातर्फे "वॉकीटॉकी'चा वापर करण्यात येणार आहे. 

निवडणुकीत होणाऱ्या प्रत्येक बाबीवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्ह्यात पाच सर्वसामान्य निरीक्षक, पाच खर्च निरीक्षक, एक पोलिस निरीक्षक, असे केंद्रीय निरीक्षक नियुक्त केले आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक उमेदवार, मतदार आणि निवडणूक यावर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे 11 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त आहेत. त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते निवडणूक कामांशी संबंधित सर्व बाबींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. 

निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजासाठी जिल्ह्यात विविध 17 समित्या नेमण्यात आल्या आहेत. 17 नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. उमेदवारांमार्फत होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च विभागाने आपल्या सर्व पथके परिपूर्ण साहित्यासह नियुक्त केली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. 
 
दिव्यांग बांधवांसाठी सुविधा 
दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे त्यांना ने-आण करणे, त्यांना व्हीलचेअरवरून मतदान कक्षापर्यंत घेऊन जाणे आदींची पूर्ण तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 98.58 टक्के मतदारांना रंगीत छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. "सर्व्हिस वोटर'ला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदाता सहाय्य केंद्र सुरू केले असून, तेथे या मतदारांकडून मतदानाचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. तसेच सैनिक मतदारांना "ईटीपीबीएस'द्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात 34 लाखांवर मतदार 
जिल्ह्यात सुमारे 34 लाख 47 हजार 184 मतदार आहेत. त्यात महिलांची संख्या 16 लाख 50 हजार 741 आहे. 
चोपडा - 3 लाख 7 हजार 760 
रावेर - 2 लाख 92 हजार 763 
भुसावळ - 3 लाख 7 हजार 5 
जळगाव शहर - 4 लाख 219 
जळगाव ग्रामीण - 3 लाख 14 हजार 604 
अमळनेर - 2 लाख 92 हजार 969 
एरंडोल - 2 लाख 79 हजार 339 
चाळीसगाव -3 लाख 41 हजार 456 
पाचोरा -3 लाख 12 हजार 962 
जामनेर - 3 लाख 8 हजार 468 
मुक्ताईनगर - 2 लाख 89 हजार 639 
------ 
आकडे बोलतात.. 
जिल्ह्यात दिव्यांग मतदार - 14 हजार 953 
सर्व्हिस वोटर - 7 हजार 870 
अनिवासी भारतीय मतदार - 36 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan sabha election jilha prashasan today machin distribute