vidhan Sabha 2019: मध्य मधून फरांदे, पश्‍चिम मधुन हिरे,चांदवडमधून डॉ.आहेर भाजपचे उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नशिक- गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल कि नाही याबाबत असलेली उत्सुकता भाजपच्या पहिल्या यादीतून संपुष्टात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रा. देवयानी फरांदे तर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून सिमा हिरे यांना पुनश्‍च उमेदवारी देण्यात आली. परंतू दोन दिवसांपुर्वी शक्तीप्रदर्शन झालेल्या पुर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांना वेटींग वर ठेवण्यात आल्याने आमदार बाळासाहेब सानप समर्थकांची घालमेल वाढली. उमेदवारी जाहीर होताचं फरांदे, हिरे समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारीचे स्वागत केले. 

नाशिक शहरातील मध्य, पश्‍चिम व पुर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे पत्ते कट होण्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरु होती. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी जोर लावला जात होता. विकास कामे दाखविण्या बरोबरचं वरिष्ठांकडे फिल्डींग लावली जात होती. नाशिक शहर राजकारणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने राज्याचे सुध्दा उमेदवारीकडे लक्ष लागले होते. भाजप-शिवसेना युती होईल कि नाही याबाबत साशंकता होती.

युती झाल्यास शिवसेनेकडून मध्य किंवा पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाची मागणी केली जात होती. भाजपकडून देखील नवीन चेहरे देण्याचे सुतोवाच पालकमंत्री गिरीष महाजन यांनी अनेकदा केल्याने भाजप मध्ये देखील अनेकांच्या आमदार होण्याच्या महत्वकांक्षेला धुमारे फुटले होते. सर्वचं इच्छुकांकडून वरती बोलणे झाले आहे, कामाला लागण्याचा संदेश दिल्याचे सांगतं तयारी लागले होते. पश्‍चिम मध्ये सर्वाधिक इच्छुक असल्याने तेथे मोठी रस्सीखेच होती. मध्य मध्ये आमदार फरांदे यांच्या ऐवजी माजी आमदार वसंत गिते यांचे नाव चर्चेत होते. परंतू अखेरच्या क्षणी दोन्ही विद्यमान आमदारांनी बाजी मारतं पहिल्या यादीत नाव आणल्याने ÷अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार हिरे यांना उमेदवारी देताना कै. पोपटराव हिरे यांचे जनसंघापासूनचे योगदान तर आमदार फरांदे यांना उमेदवारी देताना निष्ठावान हा मुद्दा महत्वाचा मानतं उमेदवारी जाहीर करण्यात आली. सोमवारी सर्वचं उमेदवारांचे पत्ते कट झाल्याचे वृत्त बाहेर पडल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. परंतू मंगळवारच्या यादीत मात्र मध्य व पश्‍चिम मतदारसंघातून आमदार प्रा. देवयानी फरांदे व सिमा हिरे यांचे नाव जाहीर झाल्याने दोन मतदारसंघापुरता विषय निकाली निघाला. पक्षाचे संघटनमंत्री किशोर काळकर यांनी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात दोन्ही उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दिले. 

चांदवड मधून डॉ. आहेर 
चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातून देखील विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना पक्षाने उमेदवारी दिली. येथून त्यांचे चुलत बंधू व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर इच्छुक होते. चुलत भगिनी व महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके मध्य किंवा पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. परंतू आहेर कुटूंबातील एकाला उमेदवारी देण्याचा भाग म्हणून विद्यमान आमदार डॉ. आहेर यांना उमेदवारी देण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan sabha farande,hire,aher