Vidhan sabha : विकासकामांमुळे जनता खडसेंच्या पाठिशी : दशरथ कांडेलकर  

live photo
live photo

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विविध विकासकामे केली. या कामांच्या बळावरच जनता सदैव श्री. खडसेंच्या पाठिशी असून, भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर या किमान ३० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर यांनी व्यक्त केला. मुक्ताईनगर -निमखेडी जिल्हा परिषद गटातील प्रचारफेरीदरम्यान ते बोलत होते. 
भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या प्रचारफेरीस ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी श्री. कांडेलकर म्हणाले, की आमदार एकनाथराव खडसे यांनी सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन तीस वर्षे मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. भव्य पुलांची निर्मिती केली. गावे डांबरी रस्त्याने जोडली. गावागावांत समाज मंदिरे, बौद्ध विहार, शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या देऊन विकासाची गंगा वाहती ठेवली. विशेषत: कोळी समाजासाठी भरीव कामगिरी केली. राज्यातील सर्व कोळी समाज बांधवाना टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात वारंवार शासन दरबारी आक्रमक भूमिका घेतली. रोहिणी खडसे यांनी जिल्हा बँकेला 'क' वर्गातून 'अ 'श्रेणीत आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. सूतगिरणी, साखर कारखान्याच्या माध्यमातून हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार दिला असल्याचे श्री. कांडेलकर यांनी सांगितले. प्रचारादरम्यान, मतदारांनी नाथाभाऊंचे हात बळकट करण्यासाठी फक्त विकासकामांना मतदान करून रोहिणी खडसेंना विजयी करावे, असे आवाहन केले. 
यावेळी प्रचार रॅलीत बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, चंद्रकांत भोलाने, संदीप जावळे, शेषराव पाटील, पुरुषोत्तम पाटील, नीलेश खोसे, पुंडलिक वानखेडे, रवींद्र सांगळकर, वासुदेव कोळी, प्रवीण वाघ, संतोष कोळी, नितीन पाटील आदी उपस्थित होते. 

मराठा समाजाचा सन्मान 
नाथाभाऊंनी जातीपातीच्या राजकारणाला कधीही थारा दिला नाही. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध कार्यकारी सोसायटीमध्ये वेळोवेळी संधी देऊन नेहमीच मराठा समाजाचा सन्मान केला आहे. मराठा आरक्षणावरही त्यांनी आपली सकारात्मक भूमिका मांडून सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आपले स्पष्ट मत विधानसभेत मांडले होते. नाथाभाऊच्या मार्गदर्शनाने राजकीय तालमीत वाढलेल्या ॲड. रोहिणी या उच्चशिक्षित असून, आक्रमक आहेत. त्यांना विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाथाभाऊंना साथ देण्यासाठी रोहिणी खडसेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य विकास पाटील यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com