बंडखोर उद्या थंड होतील:गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

जळगाव : :नाशिक,नगरसह उत्तर महाराष्ट्रातील भाजपतील बंडखोर उमेदवारांशी समक्ष भेटून तसेच फोनवर चर्चा केली आहे. उद्या सर्व बंडखोर माघार घेतील असा विश्‍वास राज्याचे जलसपंदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केला आहे. 
राज्यासह उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे,नाशिक, नगर येथे भाजपत मोठ्या प्रमाणात बंड झाले आहे.ते उद्या (ता.7) माघार घेणार काय?या बाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 

पक्षतील बंडखोर उमेदवाराबाबत गिरीश महाजन म्हणाले, पक्षातील बंडखोर उमेदवारांना माघारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काहीना आपण वैयक्तीक भेटून तर काही जणांना फोन करून सूचना दिल्या आहेत. त्यांना माघार घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे ते निश्‍चित माघार घेतील,उद्या (ता.7) दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झालेले असेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र पक्षाने सूचना व आदेश देवूनही जर काहींनी माघार घेतली नाही तर त्यांच्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhansabha election girish mahajan