खेडे विकास निधीवरून शिवसेना आक्रमक,भाजप नगरसेवकांना झुकते माप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेचं युतीतून मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे स्पर्धकाची भावना अद्यापही कायम असल्याचे पडसाद महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिसतं आहे

. यंदाच्या अंदाजपत्रकात भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप देताना शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलल्याने त्याचा संताप आज आयुक्तांची भेट घेवून व्यक्त करण्यात आला. असमान निधीचे वाटप, खेडे विकासाला अद्यापही निधी मिळतं नसल्याची तक्रार शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे करतं सर्वचं नगरसेवकांना समसमान निधीचे वाटप करण्याची मागणी केली. 

शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी समसमानचा नारा दिला खरा परंतू या समसमान न्यायाचा फुगा नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून फुटला. अंदाजपत्रकात भाजपच्या ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप झाल्याचे लक्षात आल्याने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्याकडे नगरसेवकांनी कैफीयत मांडली. महासभेच्या पार्श्‍वभूमीवर बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी सकाळी आयुक्तांच्या दालनात धडक मारली.   अंदाजपत्रकात कामांचा समावेश करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आल्याची बाब बोरस्ते, शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली.  जानेवारी महिन्यात झालेल्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी 23 खेड्यांना विशेष विकास निधी देण्याचे जाहिर केले होते परंतू अद्यापही निधीचे वाटप होत नसल्याने खेडे भागात पायाभुत सुविधा पुरविता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. खेडे विकास निधीचे प्रस्ताव सादर करूनही अधिकाऱ्यांकडून प्राकलन तयार केले जात नसल्याची तक्रार करण्यात आली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news village problem