मी स्वत:च फेक अकांऊटमुळे पीडित-आयुक्त नांगरे पाटील, 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

नाशिक : फेसबुक, इन्स्ट्राग्राम या सोशल माध्यमांवर माझे अकांऊट नाही तरीही माझ्या नावे अनेक अकांऊटस्‌ असून,त्यावरून अनेक सल्ले वजा संदेश दिले जातात. ते सारे फेक अकांऊट आहे. नाशिक सायबर विभागातर्फे आत्तापर्यंत 19 फेसबुक पेज आणि यु-ट्युब व्हिडिओ डिलीट केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली. 
 
सोशल मीडियावर आजची तरुणाई सर्वाधिक वेळ खर्ची घालते मात्र त्यावर अनेक फेक अकांऊट असल्याचे सांगत, आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, फेसबुक, इन्स्ट्राग्राम ही सोशल मीडियावरील माध्यमांना अनेकांच्या पसंतीची असली तरी, या माध्यमांवर माझे स्वत:चे अकांऊट नाही. मात्र तरीही या सोशल माध्यमांवर माझ्या नावाची फेक अकाऊट आहेत. याच फेक अकांऊटवरून अनेकदा सामाजिक, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातील संदेश पसरविले जातात. प्रत्यक्षात त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मलाही इतरांकडून अशी माहिती मिळते त्यावेळी समजते. त्यामुळे नाशिक सायबर पोलीस ठाण्याकडून मी आत्तापर्यंत 19 फेसबुक पेजेस आणि यु-ट्युबवरील असे फेक व्हिडिओ डिलिट करण्यात आले आहेत. अनेकदा अशा फेक अकांऊटवरून गंडविले जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अशा फेक अकांऊटचा मी देखील एक पीडित आहे
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vishwas nagre patil