अन्‌ अपंग पत्नीला मतदानासाठी आणले कडेवर! 

राजेश सोनवणे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

जळगाव ः लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा अधिकार नव्हे तर हक्‍कच आहे. हा हक्‍क न चुकता अनेकजण बजावत असतात. दिव्यांग असलेले व्यक्‍ती व्हिलचेअरचा आधार घेवून मतदान केंद्रावर पोहचतात. पण जळगावातील दोन्ही पायांनी अपंग असलेल्या पत्नीला दोन्ही हातांवर उचलून पतीने मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्‍क बजाविला. 

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सर्वत होत आहे. या प्रक्रियेतील आपण देखील एक भाग व्हावे; या दृष्टीने मतदानाचा हक्‍क बजाविला जात आहे. शहरात सकाळी पाऊस सुरू असताना देखील आजी- आजोबा तसेच दिव्यांग असलेले व्यक्‍ती चिखल तुडवत मतदान केंद्रावर येवून मतदान करताना दिसून येत होते. यातही कुमावत दाम्पत्य यात वेगळे ठरले. कारण दोन्ही पायांनी अपंग असलेल्या पत्नीला कडेवर घेवून पत्नीसोबत मतदानाचा अधिकार बजाविण्याचे काम कुमावत दाम्पत्याने केले. मतदान करून परत आल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर हक्‍क बजाविल्याचा आनंद होता. 

वरच्या मजल्यावर मतदान केंद्र 
शहरातील वाल्मिकनगर परिसरातील रहिवासी असलेले विशाल कुमावत हे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. परिसराच्या जवळ असलेले चौबे शाळा या मतदान केंद्रावर कुमावत दाम्पत्याचे नाव होते. यामुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास विशाल कुमावत हे त्यांच्या दिव्यांग पत्नीला रिक्षात घेवून केंद्रावर पोहचले. रिक्षातून त्यांनी अपंग पत्नीला दोन्ही हातांवर उचलून केंद्रावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्राच्या खोलीत घेवून गेले. यात साधारण त्यांना वर चढणे आणि मतदान करून खाली उतरण्यास साधारण एक तासाचा कालावधी लागला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vudhan sabha election divyang wife