जलव्यवस्थापनाचा पाचशे वर्षांपूर्वीचा सरदार थोरातांचा वाडा 

आनंद बोरा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

नाशिक ः संगमनेर(जि. नगर)हून 25 किलोमीटरवरील पानोडी गावात पाचशे वर्षांपूर्वीचा सरदार थोरातांचा वाडा सुस्थितीत आहे. या वाड्यातील जलव्यवस्थापन थक्क करणारे आहे. दोन बुरुजांच्या साडेतीन एकरातील वाड्याची तटबंदी चांगली आहे. 18 फूट उंच आणि 5 फूट रुंद दरवाजा स्वागतासाठी सज्ज आहे. 

नाशिक ः संगमनेर(जि. नगर)हून 25 किलोमीटरवरील पानोडी गावात पाचशे वर्षांपूर्वीचा सरदार थोरातांचा वाडा सुस्थितीत आहे. या वाड्यातील जलव्यवस्थापन थक्क करणारे आहे. दोन बुरुजांच्या साडेतीन एकरातील वाड्याची तटबंदी चांगली आहे. 18 फूट उंच आणि 5 फूट रुंद दरवाजा स्वागतासाठी सज्ज आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, डॉ. पंजाबराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ आदी या वाड्यात आल्याच्या नोंदी असल्याचे वाड्याचे प्रमुख शिवाजीराजे थोरात यांनी सांगितले. पूर्वी तीन वाडे होते. त्यातील एका वाड्याची स्थिती चांगली आहे. पूर्वी वाड्याजवळ बारव होती. वाड्याच्या एका खिडकीजवळ एकजण त्यातील पाणी वर खेचून वाड्याच्या भिंतीतील छिंद्रामध्ये ओतले जात असे. पाणी वाड्यातील सर्व खोल्यांमधून भिंतींतून जात असे. आता ती व्यवस्था बंद पडली आहे.

तिथले अवशेष त्या काळातील जलव्यवस्थापनाचे दर्शन घडवितात. आणखी एका वाड्याच्या स्वयंपाकगृहातील पाणी व्यवस्थापन बघण्यासारखे आहे. स्वयंपाकगृहात इतरांनी जाऊ नये यासाठी स्वयंपाकगृहाच्या पलीकडील भिंतीजवळ भिंतीत टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे. चुली भिंतीत बांधलेल्या असून, धूर जाण्यासाठी भिंतीतून व्यवस्था केली आहे. दोनशे व्यक्तींचा स्वयंपाक एकावेळी होईल अशी रचना केली आहे. धान्य दळण्यासाठी बैलाने फिरवणारे जाते दिसते. एकावेळी एक पोते धान्य दळता येते. 

वाड्याचा इतिहास 
सरदार थोरात हे मूळचे विरगावचे. पूर्वी पानवडी ही देवगिरीच्या जाधवांची जहागिरी होती. जाधवांचे शेवटचे जहागिरदार शिवराव प्रतापराव जाधव. त्यांना एक मुलगी होती. त्यांनीमृत्युपत्रात मुलीच्या सासरवाडीला जहागीरदारी देण्याचे लिहून ठेवले. बडोदा संस्थांनचे सरदार भगवानराव थोरात यांनी त्यांच्या मुलीशी विवाह केला. त्यांना बळवंतराव आणि शिवराव हे दोन मुले. बळवंतरावांच्या मृत्यूनंतर शिवराव यांना जहागिरी मिळाली. वाडा राजे शिवराव यांच्या ताब्यात आला आणि आजही तो त्यांच्या वंशजांच्या ताब्यात आहे. भंडारदरा धरणाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून हे धरण होण्यासाठी राजे शिवराव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, असे सांगून शिवाजीराजे थोरात म्हणाले, की 1916 मध्ये राजे शिवराव हे जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी 25 वर्षे अध्यक्षपद भूषविले. 

""वाड्याप्रमाणे गावातही जलव्यवस्थापन केले गेले. एका गल्लीतील सर्व घरांमध्ये एका बारवेतून पाणीपुरवठा होत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महनीय नेत्यांच्या स्पर्शाने पावन झालेला हा वाडा आहे'' 
- शिवाजीराजे थोरात (वाड्याचे मालक) 
 

Web Title: marathi news wada panodi