गावठाणातील वाड्यांचे सर्वेक्षण, अतिधोकादायक वाडे पोलिस बळाने उतरवणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नाशिक ः यंदा पावसाळ्यात वाडे पडण्याच्या घटनांत वाढ झाल्याने व भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याच्या शक्‍यतेने आता गावठाणातील वाडे, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी क्रिसिल संस्थेची नेमणूक केली असून, सर्वेक्षणात अ, ब, क व ड अशी वर्गवारी केली जाईल. "अ' वर्गातील अतिधोकादायक वाडे उतरविले जाणार असल्याने या निमित्ताने गावठाण विकासालादेखील चालना मिळेल. 

शहरात एकूण 23 गावठाणे असून, त्यातील पंचवटी व जुने नाशिक या गावठाण भागात सर्वाधिक वाडे आहेत. शहरात काझीगढी येथील 114 घरांसह 723 वाडे धोकादायक असून, त्यातील धोकादायक वाड्यांची संख्यादेखील पंचवटी व जुने नाशिक भागातच सर्वाधिक आहे. दर वर्षी पावसाळ्यात जीर्ण वाडे, इमारती पडण्याच्या घटना घडतात. यंदा पावसाळ्यात मात्र सतराहून अधिक वाडे कोसळले. कोसळत्या वाड्यांची संख्या लक्षात घेता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर धोकादायक वाड्यांना नोटिसा दिल्या; परंतु न्यायालयीन प्रकरणे व भाडेकरू हटत नसल्याने दुर्घटनेची शक्‍यता व्यक्त केली होती.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news wade in nashik