कचरा विलगीकरणापासून तीस हजारांहून अधिकजण दूरच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नाशिक- शहरात घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा विलगिकरणाचे प्रमाण 92 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. तरीही 29 हजार 639 कुटूंबांकडून अद्यापही कचरा विलगिकरण होत नसल्याने पंधरा ऑगष्टपासून अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नाशिक- शहरात घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा विलगिकरणाचे प्रमाण 92 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. तरीही 29 हजार 639 कुटूंबांकडून अद्यापही कचरा विलगिकरण होत नसल्याने पंधरा ऑगष्टपासून अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरात एकुण तीन लाख 54 हजार 971 कुटूंबे असून त्यातील तीन लाख 25 हजार 332 कुटूंबांकडून कचरा विलगिकरण करून घंटागाडीत टाकला जात असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढला आहे. 
स्वच्छ भारत अभियानात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हरप्रकारे प्रयत्न केले जात आहे. त्याप्रयत्नांचाचं एक भाग म्हणून आता ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या संकलित करून घंटागाडी मध्ये टाकण्याचे आवाहन केले जात आहे.

वर्षभरात आतापर्यंत 92 टक्के कचरा विलगिकरण करून घंटागाडीत टाकला जातो. अद्यापही 29 हजार 639 कुटूंबांकडून कचऱ्याचे विलगिकरण होत नसल्याची बाब समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये 70 तर प्रभाग क्रमांक 24 मधअये 73 टक्के कचरा विलगिकरण केला जातो. शहरात कचरा विलगिकरणाची हि सर्वात कमी आकडेवारी आहे. प्रभाग क्रमांक एक ते तीन, सहा, पंधरा, सोळा, 26 मध्ये सर्वाधिक 98 टक्के कचरा विलगिकरण होत आहे. त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक पाच, 10,11,23 व तीस मध्ये 97 टक्के कचरा विलगिकरण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 8,9,14 मध्ये 96 टक्के कचरा विलगिकरण केला जातो. 

 

Web Title: marathi news to wast problem

टॅग्स