नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात शेकडो मासे मृत्यूमुखी 

आनंद बोरा
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

नाशिकः गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात शेकडो माश्‍यांचा मृत्यू झाला. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात विरुद्ध दिशेने पोहणारे मासे एकतर वाहून गेले आणि अनेक "बॅकवॉटर' गाळात अडकून बसले. शेकडो मासे मृत्युमुखी पडलेत. स्थलांतरीत कुरव पक्ष्याच्या अचानक वाढलेल्या संख्येमुळे हा प्रकार समोर आला. 

कुरव पक्षी मृत अन्‌ गाळात अडकलेल्या मास्यांवर ताव मारताना दिसत होते. अभयारण्यात हिवाळ्यात तीनशेपेक्षा अधिक जातीच्या पक्ष्यांचे दर्शन घडते. इथे थंडीसोबत पक्षी येण्यास सुरवात झाली. अशा परिस्थितीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा परिणाम पक्षी जीवनावर होणार आहे. त्यामुळे मुबलक साठ्याचा विचार न झाल्यास अभयारण्यातील जैव विविधतेवर मोठा परिणाम होणार यासंबंधीचे गांभीर्या यानिमित्ताने पुढे आले आहे. 

राजकीय दबाव 
मासेमारीसाठी मोठी बोट पाण्यात उतरवल्या जातात. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिबंध करताच, राजकीय दबावाला त्यांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत पक्ष्यांनी मुबलक पाणी आणी खाद्यामुळे नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्याची निवड केली आहे. दरवर्षी दहा ते वीसच्या संख्येने आढळणारे फ्लेमिंगो यंदा हजाराच्या घरात पाहावयास मिळतात. हे त्यासंबंधीचे बोलके उदाहरण आहे. 

पक्षी संवर्धनाला आले महत्व 
नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात स्थलांतरीत पक्ष्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे पक्ष्यांच्या संवर्धनाला महत्व आहे. वनविभागाच्या प्रयत्नांना स्थानिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर आगामी स्थलांतरीत पक्ष्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पाण्याचे नियोजन वेळेत न झाल्यास अनेक स्थलांतरीत पक्षी कायमचे स्थलांतरण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय पक्ष्यांचा खाद्याच्या अभावामुळे मृत्यु होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्‍यक झाले आहे. 
 
Web Title: marathi news water fish death

टॅग्स