भूगर्भातील पाणी पातळी दीड मीटरने वाढली 

भूगर्भातील पाणी पातळी दीड मीटरने वाढली 

जळगाव ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 235 गावांची पाणीपातळी दीड मीटरने उंचावली आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. याचा परिणाम सर्वच ठिकाणी विहिरी, बोअरवेल, कूपनलिका यांना भरपूर पाणी आहे. जलयुक्त शिवार अभियानात 235 गावांची निवड केली होती. त्यात 3465 कामे जुलैपर्यंत पूर्ण झाली होती. त्याद्वारे 16039 टीसीएम एवढे पाणी संरक्षित झाले आहे. याचा परिणाम भावी काळात या गावांना पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने दावा केला आहे. 

जिल्ह्यात 2018-19 मध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या 4 हजार 241 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यापैकी 3465 कामे जुलै अखेर पूर्ण झाली तर 759 कामे प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पावसास चांगल्या रीतीने सुरवात झाली. आजअखेर पावसाची टक्केवारी 121 टक्केपर्यंत पोचली आहे. पाऊस चांगला झाल्याने यंदा 235 गावामध्ये झालेल्या जलयुक्त शिवार अभियानात केलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्येही चांगला पाणीसाठा झाला आहे. यामुळे त्या गावाच्या परिसरातील पाण्याची पातळी दीड मीटरने उंचावली आहे. ही पाणीपातळी आगामी पावसाळ्यापर्यंत परिसरातील विहिरी, तलाव, कूपनलिकांना पाणी देईल. यामुळे परिसरातील शेती पाण्याअभावी करपणार नाही. सोबतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. 

हतनूर धरणही भरण्याच्या मार्गावर 
यंदा झालेल्या पावसाने लहान मोठी सर्वच प्रकल्प पाण्याने तुडुंब भरली आहेत. गिरणा धरण 100 टक्के भरले. त्यापाठोपाठ वाघूर धरणही भरले. आता हतनूर धरण 95.61 टक्के भरले आहे. आगामी काही दिवसात पाऊस झाल्यास तेही शंभर टक्के भरेल. यामुळे भुसावळसह यावल, रावेर मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्‍यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. 
 
जिल्ह्यात तालुकानिहाय पाऊस असा 
तालुका--टक्केवारी 
जळगाव-107.2 
जामनेर--122.1 
एरंडोल--124.9 
धरणगाव--106.9 
भुसावळ--125.6 
यावल--132.1 
रावेर--146.3 
मुक्‍ताइर्नगर--122.1 
बोदवड--128.8 
पाचोरा--115.6 
चाळीसगाव--110.2 
भडगाव--112.4 
अमळनेर--117.9 
पारोळा--119.4 
चोपडा--118.8 
एकूण--120.7 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com