खाद्यतेलाच्या डब्ब्यात पाणी दुकानदाराची पावणे दोन लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

नाशिक :  इंदूर येथून सोयाबीन खाद्यतेलाचे डब्बे उपनगरच्या एका किराणा दुकानदारास पाठविले असता, त्या 480 डब्ब्यांमध्ये तेलाऐवजी पाणी असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित संशयिताने दुकानदारास 1 लाख 80 हजार रुपयांना गंडा घातला असून उपनगर पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
... 

कन्हैयालाल गोविंदराम जगवाणी (रा. बंगला नं.2, टेलीफोन एक्‍सचेंज रोड, उपनगर) यांचे उपनगरातील सिंधी कॉलनीमध्ये दीपक किराणा ऍण्ड जनरल स्टोअर्स हे किराणा मालविक्रीचे दुकान आहे. त्यांना, गेल्या 29 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने दीपक किराणा स्टोअर्सचे कन्हैयालाल जगवाणी यांच्याशी संपर्क साधला आणि कोमल एंटरप्रायजेसच्या माध्यमातून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी संशयिताने, तुम्हाला मधुर स्वाद कंपनीच्या इंदूर येथील सोयाबिन तेलाचा माल पाठवितो असे सांगितले. दोघांमध्ये बोलणे झाल्याप्रमाणे संशयिताने सोयाबीन तेलाचे तब्बल 480 डबे पाठविले. पाठविलेल्या मालाचे संशयिताने 1 लाख 80 हजार रुपये दुकानदार जगवानी यांच्याकडून घेतले. 

संशयिताने ठरल्याप्रमाणे खाद्यतेलाचे 480 डब्ब्ये पॅक करून जगवानी यांच्या किराणा दुकानात पाठविले. दुकानात आलेले तेलाचे डब्बे दुकानदार जगवानी यांनी खोलून पाहिले असता, त्यात खाद्यतेलाऐवजी पाणी असल्याचे आढळून आले. त्यांनी पाठविलेले ÷अन्य डब्बे खोलून पाहिले असता, त्यातही पाणीच निघाले. त्यावरून संशयिताने खाद्यतेलाच्या डब्ब्यांमध्ये पाणी टाकून पुन्हा पॅक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी उपनगर पोलीसात संशयित नीलेश कठपाल याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Web Title: marathi news water in oil