पालखेडचे आवर्तन सोडले,गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नाशिकः निफाड येवला मनमाड विविध तालुक्‍यातील गावांना पिण्यासाठीचे सुमारे 800 दशलक्ष घनफूटाचे आवर्तन आज सायंकाळी सोडण्यात आले. उद्या (ता.19) पालखेड नदीतून कालव्यात पाणी पोहोचण्याची शक्‍यता आहे. 
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून पाण्याचे दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तनाची लगबग सुरु झाली आहे. तीन दिवसांपासून पालखेड आवर्तनसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी 

सुरु होती. दोन दिवसांत आतापर्यत या मार्गावरील सुमारे 2 हजाराहून आधिक डोंगळे काढण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा करीत, कारवाई करतांनाच या मार्गावर विविध पोलिस यंत्रणांना पाणी सोडले जाणार असल्याची माहीती देण्यात आली आहे. पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सगळी तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवारी सायंकाळी पालखेडसाठी पाणी सोडण्यात आले. 
मनमाड सह येवल्यातील 38 गावांसाठीच्या पाण्यासाठी मागणी सुरु होती. मनमाड रेल्वेचे यात आरक्षण आहे. पालखेडचे पाणी रात्रीतून नदीत पोहोचेल. त्यानंतर शनिवारी 
दुपारी कालव्यात पोहोचणार आहे. 
 
Web Title: marathi news water problem