दुषित पाण्याने सिडकोवासिय त्रस्त,दुर्लक्षामुळे संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

सिडको : प्रभाग 29 मधील साईबाबानगर भागात एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. मंगळवारी (ता. 12) सकाळी पिण्याच्या पाण्यात अळ्या निघाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. संतप्त महिलांनी आज प्रभागाचे नगरसेवक मुकेश यांना घटनास्थळी बोलावून त्यांना दुर्गंधीयुक्त पाणी दाखविले. महापालिकेने या भागात तत्काळ स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे. 

साईबाबानगर भागात काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे काही मुले आजारी पडली आहेत. 

दरम्यान आज सकाळी झालेल्या पाणीपुरवाथात्य आल्या आढळून आल्याने महिला संतप्त झाल्या होत्या घटनास्थळी प्रभागाचे नगरसेवक यांनी त्यावेळी महिलांनी श्री.शहाणे यांना दुर्गधीयुक्त पाणी दाखवले या प्रकारामुळे महिलावर्गात पसरली असून महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे .

  गेल्या तीन-चार दिवसांपासून तर प्रचड पाणीपुरवठा होत असल्यामुळे काही नागरिकांनी बिसलरीचे पाणी विकत घेऊन वापरले आहे असे सांगितले दरम्यान ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा लाईंन एकत्र झाल्यामुळे दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने तात्काळ या प्रकाराची दखल घेऊन या भागाला स्वच्छ पाणीपुरवठा कसा करता येईल याची काळजी घ्यावी. अशी मागणी महिलांनी केली आहे येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही काही महिलांनी दिला. या वेळी संगीता पाटील, सुनंदा हाडोळे, अनिता शेळके, चंद्रकला गायकवाड, सुनंदा जाधव, शिवांगी सोनार आदी उपस्थित होत्या . 

महापालिकेने ड्रेनेज लाइन व पाणीपुरवठयाची लाइन एकत्र झाली आहे का हे तपासून याबाबत त्वरित सुधारणा करावी तसेच नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा. 
-मुकेश शहाणे, नगरसेवक, प्रभाग 29 

Web Title: marathi news water problem