दुषित पाण्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

सिडको: परिसरातील प्रभाग 29 मधील साईबाबानगर व महाकाली चौक भागात चार दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असून मंगळवारी (ता.12) पाण्यात आळ्या व अन्य जीवजंतु आढळून आल्याने नागरिकांनी तक्रार केली होती. यानंतर महांपालिकेच्या अधिकार्यांनी याठिकाणी पाहणी करून संपूर्ण पाईपलाईन साफ केली असून ड्रेनेज व पाणी लाईन एका ठिकाणी आलेल्याची पाहणीही सुरु केली आहे. 

 सिडकोतील प्रभाग क्रमांक 29 मधील साईबाबानगर व महाकाली चौक परिसरात मागील चार दिवसांपासून दुषित पाण्याचा पुरवठा होत होता. नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही काहीही उपयोग होत नव्हता. मंगळवारी या परिसरातील नळांमधून आलेल्या पाण्यात आळ्या किंवा अन्य जीवजंतू आढळून आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली होती.

श्री.शहाणे यांनी अधिकार्यांनी घटनास्थळी बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर काल (ता.12) सायंकाळपासून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी दौलत घुले यांचेसह कर्मचार्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून येथे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच पूर्णपणे साफ केली. यावेळी काही घाण आढळून आल्याने नागरिकांनी सांगितलेल्या गोष्टीत तथ्य असल्याचे दिसून आले.

  आज संपूर्ण परिसरात ड्रेनेज लाईन व पाण्याची लाईन एकत्र येत असलेल्या परिसराची पाहणी करून ज्या ठिकाणी लिकेज असले तेथे सुधारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. सिडकोत परिसरातील याच भागात नव्हे तर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन व पाणी पुरवठा करणारी लाईन एकत्र झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीही सिडकोत अशा प्रकारे दुषित पाण्याचा पुरवठा झाल्याचा प्रकार घडला होता. सिडकोतील ड्रेनेजच्या लाईन लिकेज होवून ते पाणीपुरवठ्याच्या लाईन मध्ये जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे आता या दोन्ही लाईन बदलण्यासाठी महानगर पालिकेने खास तरतुद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे दुषित पाणी पुरवठा होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून जीवीत हानी झाली तर याची जबाबदारी महापालिका घेणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 
Web Title: marathi news water problem