नगरपालिकांत छतावरचे पाणी अडविले जाउ शकते-  जिल्हाधिकारी मांढरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

नाशिक ः दुष्काळ पडला म्हणजे पाण्यासाठी रस्त्यावर यायचे पण जेव्हा पाउस पडतो तेव्हापासूनच त्याचे नियोजन का करु नये. जिल्ह्यातील नगरपालिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली. 

जिल्ह्यात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून पाण्यासाठी ठिकठिकाणच्या नगरपालिकांत आक्रोश सुरु झाला आहे. टंचाईच्या काळात पाण्यासाठी नियोजन करणाऱ्या नगरपालिकांच्या  यंत्रणांनी पावसाळ्यात छतावरील पाणी अडविण्यासाठी नियोजनाला लागले पाहिजे. त्यासाठी नगरपालिका बांधकाम परवानग्या देतांनाच, हा नियम करु शकतात. असे सुचविले. 

मनमाड नगरपालिकेतील पाणी टंचाईच्या निमित्ताने छतावरील पाणी अडविण्याचा विषयाची सुरुवात झाली. मनमाडमधील पाण्याबाबत आक्रमक झालेल्या नगरसेवकांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, पाण्यासाठी सामान्य नागरिक नगरसेवकांकडेच येणार आणि नगरसेवक प्रशासनाकडेच येणार त्यात, गैर काहीच नाही, मात्र पाणी टंचाई 
निर्माण झाली म्हणजे जसे लोकप्रतिनिधी पुढाकार घेतात, त्याच प्रकारे नगरपालिकांत कामकाजा दरम्यान छतावरचे पाणी अडविण्यासारख्या उपाययोजना करण्यासाठी उत्साह दाखविला गेला नगरपालिकांनी बांधकाम परवानग्या देतांनाच, छतावरचे पावसाचे पाणी अडविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या उपक्रमांला चालना दिली तर त्याचा चांगला 
परिणाम होउ शकतो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water problem