पाणीप्रश्‍नावरून पदाधिकारी-प्रशासनात विसंवाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

नाशिक   शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील इन्टेक वेलपर्यंतच्या पाण्याने न्यूनतम पातळी गाठल्याने पंपिंगपर्यंत पाणी पोचण्यासाठी चर खोदणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष पदाधिकाऱ्यांनी काढत प्रशासनाला तसे आदेशित केले. युद्धपातळीवर प्रशासनाकडून काम हाती घेतले जाणार आहे. पावसाळा लांबला तरी जुलैअखेर धरणातील पाणी पुरणार आहे. चर खोदण्याच्या कामाची गती व पावसाचा अंदाज घेऊन प्रशासनाने अहवाल सादर करावा. त्यानंतर पाणीकपातीबाबत निर्णय घेऊ, असा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी घेतला. 

प्रशासनाकडून पाणीकपातीचे संकेत देण्यात आल्यानंतर महापौर भानसी यांनी धरणातील पाण्याची स्थिती व प्रशासनाकडून चर खोदण्याच्या होणाऱ्या मागणीचा विचार करून गंगापूर धरणाची पाहणी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, उपमहापौर प्रथमेश गिते, मनसे गटनेते सलीम शेख, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, रिपब्लिकन पक्षाच्या दीक्षा लोंढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

चर खोदण्याच्या सूचना 
गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनपर्यंत चर खोदण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेला चर 18 मीटर खोल आहे. त्यापुढे चार मीटर उंचीचा खडक अडथळा ठरत असल्याने तो फोडून पुढे धरणाच्या मध्यभागापर्यंत चर पोचल्यास उताराच्या गतीने पाणी पंपिंग स्टेशनपर्यंत पोचून 31 जुलैपर्यंत पाणी पुरविता येणार आहे. चर धरणात खोलवर नेण्यासाठी अडथळा ठरणारा खडक न फोडल्यास अवघे 300 दशलक्ष घनफूट पाणी 20 ते 22 दिवस पुरेल, त्यानंतर शहरात टंचाई निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार चर खोदण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंडर वॉटर ब्लास्टिंगद्वारे खडक फोडला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water problem