नाशिककरांना पाण्यावाचून करमेना...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

नाशिक- भविष्यातील पाण्याची चिंता डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने रविवार पासून एकवेळ पाणी कपात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गुरुवारीत संपुर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून ड्राय डे साजरा केला. पण यामुळे नाशिककरांचे हाल झाले. आकाशातून एकीकडे पाऊस पडतं असताना नळांच्या तोट्या मात्र पुर्णपणे खोलूनही पाण्याचा थेंब देखील न आल्याने राखून ठेवलेल्या पाण्यावरचं दिवस भागवावा लागला. शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये "जार' च्या पाण्यावर तहान भागवावी लागली. तर ज्यांच्याकडे पाणी साठविण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी पाणी उसने घेण्याची वेळ नागरिकांवर आली.

नाशिक- भविष्यातील पाण्याची चिंता डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने रविवार पासून एकवेळ पाणी कपात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गुरुवारीत संपुर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून ड्राय डे साजरा केला. पण यामुळे नाशिककरांचे हाल झाले. आकाशातून एकीकडे पाऊस पडतं असताना नळांच्या तोट्या मात्र पुर्णपणे खोलूनही पाण्याचा थेंब देखील न आल्याने राखून ठेवलेल्या पाण्यावरचं दिवस भागवावा लागला. शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये "जार' च्या पाण्यावर तहान भागवावी लागली. तर ज्यांच्याकडे पाणी साठविण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी पाणी उसने घेण्याची वेळ नागरिकांवर आली. विशेषता जुने नाशिक सारख्या भागात पाणी कपातीचा परिणाम दिसून आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water problem