तीस कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. 
   

अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. 
   

या योजनेसाठी खासदार सुभाष भामरे यांनी गेल्या दीड वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा केला व त्याला यश मिळाले सदर योजनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभले नामपुर शहराची आज लोकसंख्या ३५ ते ४० हजारांवर आहे. शहराचा वाढता विस्तार व्यापारी बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे .या ठिकाणी विद्यालय, महाविद्यालय, मार्केट,पोलीस स्टेशन बस स्टॅन्ड, उद्योगधंदे, बँका यासाठी लाखो लोकांची शासकीय अशासकीय कामासाठी येजा होत असते. नामपूर शहरात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. 
गावात पंधरा-पंधरा दिवसात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. महिलांना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. नामपूर शहर मोसम नदी काठावर वसलेले असून तरीदेखील पाणीपुरवठा साठा उपलब्ध होत नव्हता. ही अडचण धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार भामरे यांच्याकडे नामपुर चे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी मागणी केली त्याला प्रतिसाद देत डॉ. सुभाष भामरे यांनी स्वतः मंत्रालयात पाठपुरावा केला जून २०१८ रोजी झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा मिटिंग मध्ये सदर आराखडा मंजूर करून घेतला. सदर योजना मोठ्या स्वरूपाची असल्यामुळे त्याला खूप तांत्रिक अडचणी आल्यात तरीदेखील खा. डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिक-मुंबई वेळोवेळी अधिकाऱ्यांशी व मंत्र्यांचे मिटिंग लावून सदर योजनेचा मार्ग सुकर केला. या योजनेच्या अडचणी दूर करण्यासाठी हरणबारी पासून ते नामपुर पर्यंत येणाऱ्या गावातील सर्व ग्रामस्थांची मीटिंग जायखेडा या ठिकाणी घेऊन सगळ्यांना विश्वासात घेण्याचे काम डॉ. सुभाष भामरे यांनी केले त्यामुळे डॉ. भामरे तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहका-यामुळे पाण्याचा बिकट प्रश्न मार्गी लागलेला आहे. 
 

नामपूर शहराचा पाणीप्रश्न मिटल्यावर शहराचा विकास झपाट्याने वाढेल.पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून मोसम नदीवर केटीवेअर मंजूर झालेला आहे. त्याचे काम पूर्ण झालेले आहे तसेच मोसम नदीवरील बाजारपेठेतील पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. तळवाडे भामेर पोहोच कालवा हरणबारी उजवा कालवा यांचे काम देखील पूर्णत्वास आलेले आहे. त्याचा देखील फायदा नामपुर शहरासाठी होणार आहे .त्याचबरोबर नामपुर- सटाणा -सप्तशृंगीगड जवळ दुपदरी रस्त्याचे कामासाठी 200 कोटी रुपये मंजूर होऊन सप्तशृंगी गड पासून काम सुरू झाले आहे.

नामपुर साक्री या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे .हे करतानाच चार फाटा ते बस स्टॅन्ड हे शहराला लागुन रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नामपूर शहराचा व परिसराचा सर्वांगीण विकासासाठी डॉ. सुभाष भामरे यांनी न्याय दिलेला आहे. सदर कामासाठी डॉ.भामरे यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड, डॉ. शेषराव पाटील, डॉ. दिकपाल  गिरासे, सरपंच किरण आहिरे, नकुल सावंत, अशोक पवार, महेश सावंत, विनोद सावंत, समीर सावंत, कविता सावंत, किरण ठाकरे आदिंनी वेळोवेळी  कामाचा पाठपुरावा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news water project